esakal | बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई पण नेमकी काय? कृषी विभागसमोरील आव्हान कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Bogus Seed

खरिप हंगाम सुरु झाला की, शेतकऱ्यांची जशी पेरणीची लगबग सुरु होते तशीच बोगस बियाणे विक्री करणारेही हातपाय पसरु लागतात. मुळात एकदा बियाणे खरेदी केल्यास ते उगवून आल्यानंतर, तसेच त्याचे उत्पादन कमी आल्यानंतर बियाणे बोगस असल्याचे स्पष्ट झाल्याचीही कैक उदाहरणे आहेत, त्यामुळे यंदाच्या खरीपात बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर ठोस कारवाई करणे हे कृषी विभागासमोर आव्हान असणार आहे.

बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई पण नेमकी काय? कृषी विभागसमोरील आव्हान कायम

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: खरिप हंगाम सुरु झाला की, शेतकऱ्यांची जशी पेरणीची लगबग सुरु होते तशीच बोगस बियाणे विक्री करणारेही हातपाय पसरु लागतात. मुळात एकदा बियाणे खरेदी केल्यास ते उगवून आल्यानंतर, तसेच त्याचे उत्पादन कमी आल्यानंतर बियाणे बोगस असल्याचे स्पष्ट झाल्याचीही कैक उदाहरणे आहेत, त्यामुळे यंदाच्या खरीपात बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर ठोस कारवाई करणे हे कृषी विभागासमोर आव्हान असणार आहे.

हेही वाचा- शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

मागील वर्षी २०१९ च्या खरिपाचा विचार केला तर म्हणावी तशी कारवाई झाल्याचे दिसले नाही, तसेच ज्या थोडथोडक्या प्रमाणात कारवाई झाली, कृषीसेवा केंद्रचालकांचे परवाने रद्द करण्यापलीकडे त्याचे पुढे झाले हा प्रश्‍न मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. असे असले तरी यंदा कारवाई करणे, तसेच अशा कृत्याची पूनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्नशील राहणे कृषी विभागाला गरजेचे आहे.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा लॉकडाउनमुळे बोगस बियाणे विक्रेत्यांचे फावणार असल्याने कृषी विभागाने दरवर्षीपेक्षा वेगळ्या पद्धतीने भरारी पथकांची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. मोटे म्हणाले.

हे वाचलंत का- पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्हीच ठरवणार आहात ताईच्या चेहऱ्यावरचं हसू, अन् डोळ्यातलं अश्रू

अशी आहे पथकांची रचना
बोगस बियाणे विक्री, तसेच अवैध पद्धतीने खते विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हा व तालूका पातळीवर अशी दोन प्रकारची पथके नेमण्यात आली आहेत. जिल्हा पातळीवरील पथकात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, मोहिम अधिकारी, गुण नियंत्रण अधिकारी, वजन मापे निरीक्षक असे अधिकारी आहेत.

तसेच तालूका पातळीवर प्रत्येक तालूक्यात एक पथक नेमण्यात आले असून या पथकात संबंधित तालूका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि वजन मापे निरीक्षक अशा अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे डॉ. मोटे यांनी सांगितले.

क्लिक करा- गोपीनाथराव मुंडे : कायम संघर्ष वाट्याला आलेले लोकनेते 

ही झाली आहे कारवाई
प्रामुख्याने यंदाच्या खरीप हंगामात अवैध खते, तसेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांविरोधात तीन तालूक्यात कारवाई करण्यात आल्याचे डॉ. मोटे यांनी सांगितले. मागील आठवडाभरात साधारण अवैधपणे खत विक्री करणारे सिल्लोड तालूक्यातील चार दुकाने, फुलंब्री तालूक्यातील खतांची पाच दुकाने तसेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्या गंगापूर तालूक्यातील एका कृषी सेवा केंद्राविरोधात कारवाई करण्यात आल्याचे डॉ. मोटे म्हणाले.

एखाद्या कृषी सेवा केंद्रात डमी गिऱ्हाईक पाठविणे, संबंधित दुकानांचा साठा, परवाना तपासणे आदि बाबींची संपूर्ण माहिती घेतली जाते. तसेच नमूनेही काढले जातात. त्यानंतर कारवाई करण्यात येते. मोठे प्रकरण असल्यास साठा कोठून आणला याविषयी पोलिस केस यासारखी कारवाई करण्यात येते.
- डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद.

हेही वाचा-Coronavirus : उस्मानाबादमध्ये एकाच कुटुंबातील आठ जणांना बाधा, आज ११ रुग्ण