मुलींच्या अपेक्षा वाढल्याने मुलांवर अविवाहित राहण्याची वेळ (वाचा नेमकी परिस्थिती)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020


औरंगाबादेतील कुलस्वामिनी मंगल कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय वधू-वर मेळावा नुकताच पार पडला. नाते मनाचे, समाजमित्र आणि सप्तशृंगी वधू-वर सूचक केंद्रातर्फे आयोजित मेळाव्यात वधूवरांसह पालकांची उपस्थिती होती

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून सर्वच समाजांत मुलींचे प्रमाण घटत आहे. अशातच मुलींचे शिक्षण वाढत असल्याने अनेक मुलींना आपल्याला अनुरूप मुलगाच हवा असतो. या वाढत्या अपेक्षेमुळे मात्र अल्पशिक्षित मुलांवर अविवाहित राहण्याची वेळ येत असल्याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या नाते मनाचे, समाजमित्र आणि सप्तशृंगी वधू-वर सूचक केंद्रातर्फे आयोजित राज्यस्तरीय सर्वजातीय वधू-वर मेळाव्यात आला. 

हेही वाचा- सत्तेतल्या नेत्यांनो, वायफळ बडबड करू नका

कुलस्वामिनी मंगल कार्यालयात आयोजित वधू-वर मेळाव्याचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरदार वल्लभभाई पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष बाबासाहेब शेळके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर भगवान घडामोडे, माजी नगरसेवक मोतीराम घडामोडे, नगरसेवक नितीन चित्ते, भाजप पदाधिकारी विलास कोरडे, लक्ष्मीकांत थेटे, अर्जुन गवारे पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

क्लिक करा- समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा

कुलस्वामिनीचे अध्यक्ष विलास कोरडे व भाजप गारखेडा मंडळ अध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे यांनी सर्वजातीय उपक्रमाचे कौतुक केले व शक्‍य त्या मदतीचे आश्वासन दिले. "नाते मनाचे'चे संचालक शंतनू चौधरी यांनी लग्न जमविण्यासाठी प्रत्येकाने या कामाला महत्त्व व वेळ देण्याची गरज व्यक्‍त केली. ज्येष्ठ संचालक रामचंद्र अंधारीकर व देविदास जोशी यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्यात दोनशे पाच वधू-वरांची नोंद झाली. पहिल्या सत्रात वधू-वरांनी परिचय दिला व दुसऱ्या सत्रात वधू-वरांची प्रत्यक्ष थेट भेट करून देण्यात आली. कार्यक्रमासाठी दत्तात्रय पिंपळे, अंबादास देशपांडे, कमलाकर जोशी, सुधीर देशपांडे, रवी कुलकर्णी, अशोक दगडे यांनी पुढाकार घेतला.

हे वाचलंत का?- ऍकॅडमिक ऑडिट नसल्यास महाविद्यालयांचे संलग्निकरण रद्द


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boys are unmarried due to too much demanding of girls for marriage