esakal | औरंगाबादेत आणखी एक महिला पॉझिटिव्ह, चोवीस तासांत तीन रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

आसेफिया कॉलनीतील महिला जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. तिची कोवी़ड-१९ चाचणी सोमवारी पॉझिटीव्ह आली आहे. ती कुणाच्या संपर्कात होती याची माहिती घेतली जात आहे. रवीवारी शहरातील अभयपुत्र कॉलनी, समतानगर येथे ३८ वर्षीय तरुण व आरेफ कॉलनीतील ५५ वर्षीय व्यक्तीची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

औरंगाबादेत आणखी एक महिला पॉझिटिव्ह, चोवीस तासांत तीन रुग्ण

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद - औरंगाबादेत रवीवारी (ता. १९) दिवसभरात दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर सोमवारी (ता. २०) आसेफिया कॉलतील एक पासष्ट वर्षीय महिलेची कोवीड -१९ चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

या रुग्णासह चोवीस तासांतील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या तीनवर पोचली आहे. तर आतापर्यंत १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तिघांचा मृत्यु तर पंधरा रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

आसेफिया कॉलनीतील महिला जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. तिची कोवी़ड-१९ चाचणी सोमवारी पॉझिटीव्ह आली आहे. ती कुणाच्या संपर्कात होती याची माहिती घेतली जात आहे. रवीवारी शहरातील अभयपुत्र कॉलनी, समतानगर येथे ३८ वर्षीय तरुण व आरेफ कॉलनीतील ५५ वर्षीय व्यक्तीची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

समतानगर येथील तरुण काच व फर्निचरचे काम करतो. सुमारे पाच वर्षांपासून तो या भागात पत्नी व दोन मुलांसह राहतो. तो काही महिन्यांपूर्वी नागपूर येथे गेला होता. त्यानंतर तो शहरातून बाहेर कोठेही गेला नाही.

तो कुणाच्या संपर्कात आला नसल्याचे त्यांच्या परिचिताकडून सांगितले जात आहे. तो बाधित असल्याचे स्पष्ट होताच आरोग्य विभागाचे पथक कोरोनाबाधित तरुण राहत असलेल्या ठिकाणी गेले. त्यानंतर नातेवाइकांची चौकशी केली. यातील पाच ते सहाजणांना रुग्णवाहिकेद्वारे तपासणीसाठी नेण्यात आले असून, त्यांचेही स्वॅब घेतले जाणार आहेत. 

आरेफ कॉलनीतील ५५ वर्षीय पुरुष रविवारी (ता. १९) सकाळी ११ वाजता घाटी रुग्णालयात भरती झाला. सायंकाळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा