esakal | Breaking News : औरंगाबादेत कोरोनाचा दुसरा बळी, ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

पुणे येथून आलेल्या आरेफ कॉलनीत ३९ वर्षीय अभियंत्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या ६८ वर्षीय वडीलांनाही लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले होते/. त्यानंतर त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते.

Breaking News : औरंगाबादेत कोरोनाचा दुसरा बळी, ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात तब्बल चार रुग्ण सोमवारी (ता. १३) पॉझिटिव्ह आढळले. यातील ६८ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मंगळवारी (ता. १४) दुपारी दीडच्या सुमारास मृत्यू झाला. ते शहरातील आरेफ कॉलनी येथील रहिवाशी होते, अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. सोमवारी (ता. १३) त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.

पुणे येथून आलेल्या आरेफ कॉलनीत ३९ वर्षीय अभियंत्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या ६८ वर्षीय वडीलांनाही लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले होते/. त्यानंतर त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते.

आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय रुग्णाचे आठ एप्रिलला स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तेव्हा त्यांच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर पुन्हा ११ एप्रिलला स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यावेळी मात्र त्यांच्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह (सकारात्मक) आला. त्यांना ताप, खोकला व श्‍वसनाला त्रास ही लक्षणे जाणवत होती.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यांना व्हेंटिलेटरवर (जीवरक्षक प्रणाली) ठेवण्यात आले होते. परंतु मंगळवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी सातारा परिसरातील ५८ वर्षीय बॅंक व्यवस्थापकाचा मृत्यू झाला होता. आता ही संख्या दोनवर गेली असून, औरंगाबादेत कोरोनाचा धोका वाढला आहे.

कुटुंब-नातलगांच्या संपर्कातून संसर्ग

जलाल कॉलनी, आरेफ कॉलनी, किराडपुरा येथील रुग्ण व त्यांच्या संपर्कातील नातलग रुग्ण, सातारा परिसर आणि सिडको एन-चार येथील महिला, त्यांची नात, देवळाईतील चालक व त्यांची पत्नी यांना संसर्ग झाल्यानेच कोरोनाची संख्या वाढली आहे. नातलगात व कुटुंबांतच हा संसर्ग वाढत आहे.

संख्या वाढण्याचा धोका

औरंगाबादेत रुग्णांची संख्या २४ वर गेली आहे. यात बहुतांश जणांची ट्रॅव्हल हिस्ट्री आहे. खासकरून कुटुंबात आणि आपसातील नातलगांत संसर्ग झाल्याचे आतापर्यंतच्या प्रकरणावरून पुढे आले आहे.

बाबासाहेब करायचे योगा, त्यांच्या या पाच गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का...