esakal | औरंगाबाद शहरही ‘ग्रीन झोन’मध्ये आणा - सुभाष देसाई 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

राज्यात काही ठिकाणी टोळधाडीचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक यंत्रणा सज्ज ठेवावी. खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य, मार्गदर्शन कृषी विभागाने उपलब्ध करून द्यावे. ग्रामीण आणि शहरी भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा. टँकरद्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठा पावसाळ्यापर्यंत व्यवस्थित सुरू राहील, याची कटाक्षाने काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

औरंगाबाद शहरही ‘ग्रीन झोन’मध्ये आणा - सुभाष देसाई 

sakal_logo
By
राजेभाऊ मोगल

औरंगाबाद शहरही ‘ग्रीन झोन’मध्ये आणा - सुभाष देसाई 
औरंगाबाद : औरंगाबादच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग रोखण्यात यंत्रणेला यश मिळत आहे, ही समाधानकारक बाब असून, याच पद्धतीने शहरातील कोरोना संसर्गही आटोक्यात आणून ‘ग्रीन झोन’मध्ये आणा, अशा सूचना उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिले. 

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. ३०) मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली. जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले, की शहरातील रुग्णसंख्या नियंत्रित करण्यासाठी ‘टास्क फोर्स’च्या सूचनांप्रमाणे उपचारपद्धती अधिक सशक्त करावी. महापालिकेने वॉर्डनिहाय ताप तपासणी शिबिरांचे आयोजन करावे.

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात.. 

यामध्ये खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी. जिल्हा रुग्णालय, घाटी व इतर रुग्णालये, उपचार केंद्रात ऑक्सिजन, रक्ताचा व्यापक साठा उपलब्ध करून ठेवावा. 
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी ‘घाटी’मध्ये अतिगंभीर रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होत असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या चांगले असल्याचे सांगितले. 

हेही वाचा : बोंबाबोंब झाल्यानंतर आली प्रशासनाला जाग

प्रशासक आस्तिककुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले, घाटी रुग्णालयाचे डॉ. शिवाजी सुक्रे, औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार उपस्थित होते. 

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ  

टोळधाडीवर सज्ज ठेवा प्रतिबंधात्मक यंत्रणा 