esakal | बैलांचा पाय घसरुन बैलगाडी, शेतकरी पडले कालव्यात; ग्रामस्थ होते म्हणून वाचले जीव

बोलून बातमी शोधा

Aurangabad Paithan News}

शेतात जात असतांना वितरिका क्रंमाक दोन शेजारी बैलांचा पाय कालव्यात घसरून बैलगाडी पाण्यात गेली. या घटनेची माहिती आजुबाजुच्या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

बैलांचा पाय घसरुन बैलगाडी, शेतकरी पडले कालव्यात; ग्रामस्थ होते म्हणून वाचले जीव
sakal_logo
By
गजानन आवारे

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : कातपूर (ता.पैठण) येथील स्थानिक शेतकरी डाव्या कालव्याच्या बाजूच्या रस्त्यावरून बैलगाडी घेऊन जात असताना बैलांचा पाय घसरून बैलांसह बैलगाडी, शेतकरी कालव्यात पडले. प्रसंगावधानाने शेतकरीसह दोन्ही बैलाना वाचविण्यात यश आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कातपुर येथील शेतकरी कचरु कोंटबे व भारत कोंटबे हे दोघे चुलतभाऊ शेतात जाण्यासाठी बैलगाडी आणि एक गाय व एक वासरु घेऊन त्यांच्या गट क्रमांक ५८ मध्ये असलेल्या शेतात चालले होते.

हेही वाचा - ग्रामीण भागातील शाळा २० मार्चपर्यंत बंद; १०वी व १२ वीच्या वर्गांना मात्र परवानगी

शेतात जात असतांना वितरिका क्रंमाक दोन शेजारी बैलांचा पाय कालव्यात घसरून बैलगाडी पाण्यात गेली. या घटनेची माहिती आजुबाजुच्या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी कोयत्याच्या साहाय्याने दोन्ही बैलांचे दावे तोडून बैल व गाडी पाण्याबाहेर सुखरुप बाहेर काढल्यामुळे बैल वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. त्यानंतर एक गाय व एक वासरुचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी त्यांना पाण्याबाहेर काढले या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

संपादन - गणेश पिटेकर