जातीच्या दाखल्याअभावी प्रवेशाची डोकेदुखी वाढणार

दुर्गादास रणनवरे
मंगळवार, 5 मे 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या, कार्यालयाची कामे वर्क फ्रॉम होम आहेत. शासन व प्रशासनाने योग्य पावले उचलत वर्क फ्रॉम होम या प्रणालीचा उपयोग करण्याचे आदेश समाजकल्याण विभागाला देण्यात याव्यात. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होईल.

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेवर मिळण्याची श्यक्यता दिसत नसल्याने हजारो विद्यार्थी तसेच पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जात प्रमाणपत्र वेळेवर मिळाले नाही तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीतीदेखील विद्यार्थी व पालकांना सतावते आहे.

लॉकडाउनमुळे सर्वच शासकीय कार्यालये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे समाजकल्याण विभागाचे जातपडताळणी विभाग कार्यालयसुद्धा बंद होते. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात विविध शाळा, महाविद्यालयात तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी विद्याशाखेत प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थी व पालकांनीही डोकेदुखी वाढणार आहे.

हेही वाचा- बापरे..कोरोनाचा खासगी खर्च तीन लाख रुपये....

सरकारने या वर्षी मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले आहे. तसेच यापूर्वी विविध समाजघटकांनाही आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यानुषंगाने अनेक विद्यार्थ्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकीसारख्या विविध क्षेत्रांतील महाविद्यालय शिक्षणासाठी जातीचे दाखले मिळण्यासाठी कार्यवाही केली होती; परंतु समाजकल्याण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या जातपडताळणी विभागाकडून योग्य तो निपटारा होत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले पडताळणीअभावी निकाली निघालेले नाहीत. 

वर्क फ्रॉम होम करून दावे निकाली काढण्याचे आदेश द्या 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या, कार्यालयाची कामे वर्क फ्रॉम होम आहेत. शासन व प्रशासनाने योग्य पावले उचलत वर्क फ्रॉम होम या प्रणालीचा उपयोग करण्याचे आदेश समाजकल्याण विभागाला देण्यात याव्यात. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होईल. तसेच कार्यालये पूर्ववत सुरू झाल्यानंतर योग्य तो वेळ जातपडताळणी करण्यासाठी वाढवून दिला जावा अशी मागणी विद्यार्थी व पालकांतून होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caste Validity Certificate Aurangabad News