esakal | दुभत्या गायी आणायच्या कशा ?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जनावरांचे आठवडी बाजार भरणे बंद झाले. यामुळे ज्या आठवडे बाजारातून दुभती जनावरे खरेदी केली जातात ते आठवडी बाजारच बंद राहिल्याने दुभत्या जनावरांची खरेदी करता आली नाही.

दुभत्या गायी आणायच्या कशा ?

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : विशेष घटक योजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदानावर दुभत्या जनावरांचे वाटप जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येते. मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे आठवडी बाजार बंद होते, यामुळे दुभती जनावरे खरेदी करता आली नाहीत यामुळे दुभती जनावरे वाटपाचे नियोजित उद्दिष्ट साध्य झाले नाही. निम्म्याहून अधिक लाभार्थींना ४० टक्के रकमेचे वाटप रखडले आहे. 

पशुसंवर्धन विभागाकडून विशेष घटक योजनेंतर्गत ७५ टक्के अनुदानावर दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा करण्यात येतो. अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातून लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. यामध्ये प्रति लाभार्थ्यांना २ संकरित दुधाळ गायी किंवा म्हशीचा एक गट दिला जातो. याशिवाय विशेष घटक योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांना खाद्य पुरवठा करण्यात येतो. इतर शासकीय योजनांतर्गतही जनावरांचा पुरवठा करण्यात आलेला असल्यास खाद्य पुरवठा करण्यात येतो.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

२०१९ - २०२० या वर्षासाठी या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली मात्र कोरोना महामारीला सुरुवात झाल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे जनावरांचे आठवडी बाजार भरणे बंद झाले. यामुळे ज्या आठवडे बाजारातून दुभती जनावरे खरेदी केली जातात ते आठवडी बाजारच बंद राहिल्याने दुभत्या जनावरांची खरेदी करता आली नाही. परिणामी या योजनेसाठी निवडण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी निम्म्याहून अधिक लाभार्थ्यांचे ४० टक्के अनुदान आणि पशू खरेदी रखडली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जिल्ह्यात या योजनेसाठी औरंगाबाद, पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यातील प्रत्येकी ६, सिल्लोड, कन्नड तालुक्यातून प्रत्येकी ४, फुलंब्री एक तर सोयगाव, खुल्ताबाद तालुक्यातील प्रत्येकी दोन अशा ३९ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यांपैकी २२ लाभार्थ्यांना ६० टक्के निधी वितरित करण्यात आला आहे तर १७ लाभार्थ्यांना त्यानंतर ४० टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. तर २२ लाभार्थ्यांना ४० टक्के निधीचे वितरण रखडले आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा