esakal | मराठा क्रांती मोर्चामूळे वाढले झेंड्याचे मार्केट
sakal

बोलून बातमी शोधा

due to Maratha Kranti Morcha flag market Increased

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादेत दरवर्षी झेंड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. शहरात पूर्वी केवळ चार होलसेल डिलरतर्फे झेंड्यांची विक्री केली जात होती; मात्र मराठा क्रांती मोर्चानंतर झेंड्यांच्या मागणीबरोबर झेंडा विक्री करणाऱ्यांची संख्याही दुप्पट-तिप्पट झाली आहे

मराठा क्रांती मोर्चामूळे वाढले झेंड्याचे मार्केट

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एकजूट झाला. त्यामुळे शिवजयंतीला भगव्या झेंड्यांची मागणी वाढली आहे. चार वर्षांपूर्वी शिवजयंतीला तीस ते चाळीस हजार विक्री होणाऱ्या झेंड्यांची संख्या ही आजघडीला लाखाच्या पुढे गेली आहे. यातून जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे झेंड्यांच्या होलसेल विक्रेत्यांनी "सकाळ'ला सांगितले. 


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादेत दरवर्षी झेंड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. शहरात पूर्वी केवळ चार होलसेल डिलरतर्फे झेंड्यांची विक्री केली जात होती; मात्र मराठा क्रांती मोर्चानंतर झेंड्यांच्या मागणीबरोबर झेंडा विक्री करणाऱ्यांची संख्याही दुप्पट-तिप्पट झाली आहे. शिवजयंतीनिमित्त शहरात आठवडाभरापासून घराघरांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र, राजमुद्रा असलेले झेंडे फडकत आहेत. यासह वाहनांवरही अशीच पतका लावणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. 
वाचून तर बघा : गोष्टीतला करकोचा आला सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात... 

परराज्यातून झेंड्यांसाठी कपडा 
शहरातील होलसेल झेंडा विक्रेत्यांतर्फे हैदराबाद, अहमदाबाद, सुरत येथून कपडा मागविण्यात येत आहे. स्पर्धा वाढल्यामुळे झेंड्यांच्या किमतीवरही परिणाम झाला आहे. होलसेल किमती कमी झाल्या आहेत. पूर्वी दहा लाख रुपयांच्या आसपास झेंड्यांची विक्री होत होती. आता त्यात वाढ होऊन ती एक कोटीच्या घरात गेल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

हेही वाचा- सयाजी शिंदे म्हणाले, मी वड बोलतोय... माझा जन्म १८५७ चा 

मराठा क्रांती मोर्चातर्फे स्वस्तात झेंडा 
शिवजयंतीनिमित्त अवाच्या-सव्वा दरात झेंड्यांची विक्री होत असे; मात्र आता तीन वर्षांपासून मराठा क्रांती मोर्चातर्फे ना नफा ना तोटा या धर्तीवर झेंडा विक्री होत आहे. यामुळे झेंड्याच्या किमतीत घट झाली आहे. झेंड्याच्या नावाखाली होणारी लूटही थांबली आहे. क्रांती मोर्चातर्फे टीव्ही सेंटर येथील बुलंद छावा कार्यालय, सिंचन भवन समोर आणि वोक्‍हार्ट चौक आणि एसबीओए चौकात क्रांती मोर्चातर्फे झेंडा विक्री केला जात आहे. 

हेही वाचा- टोपे साहेब, इतकी कुठं वाट पाहायला लावतात का...

आकार बाजारातील किंमत मराठा क्रांती मोर्चाची सेंटरवरील किंमत 
14 बाय 21 15 रुपये  10 रुपये 
20 बाय 30 50 रुपये 30 रुपये 
30 बाय 45 100 ते 150 60 रुपये 
40 बाय 60 250 ते 300 100 रुपये 
60 बाय 90 350 ते 400 150 रुपये 
सहा मीटर 550 ते 600 350 रुपये 
नऊ मीटर 900 ते 1000 700 रुपये 

मराठा क्रांती मोर्चामुळे झेंड्यांच्या किमती आवाक्‍यात आल्यात. शिवजयंतीला घरघरावर झेंडा फडकत आहे. मोर्चातर्फे ना नफा ना तोटा धर्तीवर झेंड्यांची विक्री होत आहे. यापुढेही झेंडा सर्वसामान्यांना परवडेल याच पद्धतीने विकला जाणार आहे. 
सुरेश वाकडे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक. 

चार वर्षांपूर्वी काही हजारांत विक्री होत होती. आता दुप्पट-तिप्पट होत आहे. यंदाही गेल्या वर्षीपेक्षा जास्त झेंड्यांची विक्री झाली. विक्री वाढल्यामुळे यातील उलाढालही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 
लक्ष्मणराव काथार, होलसेल विक्रेते. 
 

go to top