
निवडणूक अगोदरच झाली असती, असे औरंगाबादेत विविध विकासकामांच्या भूमिपूजनावरुन सुरु असलेल्या राजकारणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले.
औरंगाबाद : निवडणूक अगोदरच झाली असती, असे औरंगाबादेत विविध विकासकामांच्या भूमिपूजनावरुन सुरु असलेल्या राजकारणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. ते शनिवारी (ता.१२) भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर आगमन होताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्यासाठी ठेवलेली मोठी खुर्ची हटवून इतर मान्यवरांसारखी खुर्ची ठेवायला सांगितले. ती ठेवल्यानंतर ते खुर्चीवर बसले. यातून आपण वेगळे नाही आहोत. आपणही सामान्य आहोत असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृतीतून पाहायला मिळाला.
यावेळी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांची उपस्थिती होती. या प्रसंगी अतुल सावे, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
ठाकरे म्हणाले, की प्रत्येक निवडणुकीत पाण्याचा प्रश्न, गुंठेवारीचा, सिडकोतील घरांची मालकी आदी प्रश्नांवर चर्चा होते. ती सोडवायला सांगितले आहेत. आणखी काय करु शकतो. याबाबत डोक्यात आकृतीबंध तयार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक त्यांच्या लाडक्या शहरात होत आहे, असे स्मारकाविषयी ठाकरे यांनी उद्गार काढले. हिंदूत्व, राष्ट्रीयत्वाचे विचार नवीन पिढीला स्मारक पाहिल्यानंतर कळेल.