esakal | केंद्राऐवजी रस्त्यातच दिला बालकांना डोस, पुंडलिकनगरातील प्रकार!
sakal

बोलून बातमी शोधा

पुंडलिकनगर.jpg

प्रशासनाला गरज जागरुकतेची : रस्त्यावरच दिला जातो बालकांना डोस!   

केंद्राऐवजी रस्त्यातच दिला बालकांना डोस, पुंडलिकनगरातील प्रकार!

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : केंद्राच्या महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे चालविण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील (आयसीडीएस) अंगणवाडी केंद्रावर आज (ता. १९) रस्त्यावरच तान्हुल्यांना लस, डोस पाजण्याची वेळ आली. कोरोना काळात असा गलथानपणा गर्भवती, स्तनदा मातांसह चिमुकल्यांसोबत झाला. सकाळी साडे अकरापर्यंत अंगणवाडी सेविका केंद्रावर न आल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांना बाळांना डोस पाजण्यासाठी आलेल्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
एकात्मिक बाल विकास योजनेत मागास, ग्रामीण, शहरी व आदिवासी क्षेत्रातील सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांच्या विकासासाठी, गर्भवती, स्तनदामाता आणि किशोरीसाठी एकत्रित सेवा देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. पुंडलिक नगर येथील रहिवाशांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी गल्ली नंबर १० मध्ये एक खोलीत जागा घेण्यात आली. मात्र, गुरुवारी (ता. १९) या अंगणवाडी केंद्रावर गेलेल्या मातांना रस्त्यावर बसून बाळांना लस, डोस पाजण्याची वेळ आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळी साडे अकरापर्यंत अंगणवाडी सेविका केंद्रावर न आल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांना बाळांना डोस पाजण्यासाठी आलेल्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. केंद्राला कुलूप बंद असल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर बसून डोस देण्यास सुरुवात केली होती. दरम्यान चावी आणुन कर्मचाऱ्यांने कुलूप उघडले असता केंद्रातील खोलीत कौटूंबिक साहित्य पडलेले होते. एकच खोली दोघांना भाड्याने देऊन डबल पैसे वसूल करण्याचा प्रकार असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. 

(संपादन-प्रताप अवचार)