esakal | IMP NEWS : औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली
sakal

बोलून बातमी शोधा

GHATI-HOSPITAL.jpg

प्लाझ्मा थेरपीच्या साहाय्याने रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी राज्य सरकारने घाटीला दिली. यासंदर्भातील अद्ययावत यंत्रसामग्री (फेरेसिस मशीन) सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

IMP NEWS : औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा पर्याय पुढे आलेला आहे. केरळ, पुणे येथे क्लिनिकल ट्रायलनंतर औरंगाबादेतील घाटी रुग्णालयातही यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. कोरोनातून बरे झालेले पत्रकार आणि ब्रदरने प्लाझ्मा संकलित करण्यासाठी रक्तदानही केले आहे, अशी माहिती मंगळवारी (ता. २३) सूत्रांनी दिली. 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.


पुणे येथे एका कोरोनामुक्त रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा (रक्तद्रव्य) दुसऱ्या बाधित रुग्णाला दिल्यानंतर तो बरा झाला. तर आणखी दोघे याच प्रक्रियेत आहेत. ही एक अभ्यास चाचणी आहे. देशात ‘आयसीएमआर’च्या मंजुरीनंतर सुमारे पन्नास ठिकाणी क्लिनिकल ट्रायल सुरू आहे.

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
 

त्याच्या निष्कर्षानंतर याबाबत निश्चित धोरण ठरविले जाणार आहे. घाटी रुग्णालयात अशाच क्लिनिकल ट्रायलसाठी प्रयत्न सुरू झाले आहे. त्यासाठी कोरोनातून बरे झालेले घाटीतील ब्रदर आणि एका पत्रकाराने तयारी दर्शविली आहे. दोघांनी सामाजिक बांधिलकी जपत घाटी रुग्णालयात रक्तदान केले आहे असे कोरोनातून बरे झालेल्या पत्रकाराने सांगितले. 

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

ट्रायलसाठी अद्ययावत यंत्र उपलब्ध 
सूत्रांनी सांगितले, की प्लाझ्मा थेरपीच्या साहाय्याने रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी राज्य सरकारने घाटीला दिली. यासंदर्भातील अद्ययावत यंत्रसामग्री (फेरेसिस मशीन) सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

 प्लाझ्मा दात्याच्या होणार तपासण्या 
प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलसाठी पत्रकार आणि घाटीतील ब्रदरचे सोमवारी (ता.२२) रक्तनमुने संकलित करण्यात आले आहे. संकलित रक्तनमुन्यांच्या माध्यमातून एचआयव्ही, मलेरिया, कावीळ, गुप्तरोग, सीबीसी आदी तपासण्या करण्यात येतील. 

आम्ही पुढाकार घेतोय, तुम्हीही घ्या 
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ‘प्लाझ्मा थेरपी’च्या माध्यमातून रुग्णांचा जीव वाचत असेल तर सामाजिक बांधिलकी जपायला हवी. त्यासाठी आम्ही पुढे येत आहोत. न घाबरता, दडपण न घेता कोरोनामुक्त झालेल्या इतरांनीही दुसऱ्यांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करावा. 
कोरोनामुक्त पत्रकार 

go to top