एससी-एसटी समुदाय कधीच पुढे जाऊ नये, यासाठी... 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 March 2020

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जामंत्री डाॅ. नितिन राऊत यांच्या सूचनेवरुन कॉंग्रेसतर्फे राज्यभर आरक्षण बचाव अभियान राबवण्यात येत आहे. 

औरंगाबाद : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जामंत्री डाॅ. नितिन राऊत यांच्या सूचनेवरुन कॉंग्रेसतर्फे राज्यभर आरक्षण बचाव अभियान राबवण्यात येत आहे.

अनुसूचित जाती विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात रविवारी (ता. १) औरंगाबाद येथून झाली. 

या कार्यक्रमास राष्ट्रीय समन्वयक मनोज बागडी, प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे, प्रदेश कार्याध्यक्ष डाॅ.जितेंद्र देहाडे, अनिल नगराळे, नामदेव पवार, प्रशांत पवार, पवन डोंगरे, संदिप पठारे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष अरूण शिरसाट व जिल्हाध्यक्ष जयप्रकाश नारनवरे यांनी केले होते. 

भाजपचे नगरसेवक आले काळे कपडे घालून आणि... 

भाजपा संविधानातून आरक्षण हटविण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा आरक्षण विरोधी आहे जनतेला सांगणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांचा आरक्षण बचाव हा संदेश घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहोत, असे मनोगत राष्ट्रीय समन्वयक मनोज बागडी यांनी व्यक्त केले. 

प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे म्हणाले, की भाजपा आणि आरएसएसची विचारधारा आरक्षण विरोधी आहे. आगामी महानगरपालिका निवडणूकीत अनुसूचित जाती विभागाला जास्तीत जास्त तिकीटे देऊ.

लातूरला कधी होणार चिकन महोत्सव

प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे यांनी भाजप सरकारवर मोठा आरोप केला. ते म्हणाले, की एससी-एसटी समुदाय कधीच पुढे जाऊ नये, यासाठी भाजपा आरक्षणाच्या विरोधात आहे. नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांनी कितीही स्वप्न पाहिले, तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरक्षण संपवू देणार नाही.

हे अभियान तीन दिवस संपूर्ण मराठवाड्यात होणार आहे. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Rally To Save Reservations For SC ST Aurangabad News