अरे व्वा भन्नाट! लातूरला होणार चिकन महोत्सव

सुशांत सांगवे
रविवार, 1 मार्च 2020

पोल्ट्री व्यावसायिक संघटना व चिकन विक्रेता संघटनेच्या वतीने लातूरात चिकन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव येत्या मंगळवारी (ता. ३) शहरातील बार्शी रस्त्यावरील गरड गार्डनमध्ये सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत होणार आहे.

लातूर : चिकन किंवा अंड्यांसंदर्भांत पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन करून पोल्ट्री व्यावसायिक डॉ. विजय जाधव म्हणाले, चिकन किंवा अंडी खाल्ल्यामुळे कोरोना होत नाही, हे आता नागरिकांना समजू लागले आहे. त्यामुळे बाजारातील चित्र बदलू लागले आहे.

यासंदर्भात अधिक जनजागृती व्हावी म्हणून पोल्ट्री व्यावसायिक संघटना व चिकन विक्रेता संघटनेच्या वतीने लातूरात चिकन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव येत्या मंगळवारी (ता. ३) शहरातील बार्शी रस्त्यावरील गरड गार्डनमध्ये सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत होणार आहे.

उस्मानाबादच्या एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी

या महोत्सवात महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने सहभागी होणार आहेत. नागरिकांना अत्यंत अल्प दरात या महोत्सवात मांसाहरी पदार्थाचा आस्वाद घेता येईल. 

व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरवात

चिकन खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरसची लागण होत असल्याची अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचल्याने या व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे.

चिकनबरोबरच गेल्या काही दिवसांपासून अंडी खरेदीसुद्धा मंदावली आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यांत साडेपाच ते सहा कोटी रुपयांचा तोटा शहर आणि जिल्ह्यातील व्यावसायिकांना बसला आहे.

पुन्हा एका बालिकेवर अत्याचार.. वाचा कुठे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chicken Festival To Be Held In Latur Coronavirus News