औरंगाबाद शतकाच्या उंबरठ्यावर : आणखी १३ पॉझिटिव्ह, संख्या ९५

मनोज साखरे
Tuesday, 28 April 2020

बाधितांपैकी 12 किलेअर्क येथील असून, एक भावसिंगपुरा येथील आहे. यात सोळा वर्षांखालील सहा मुलं, तर इतर सात जण 44 वर्षाआतील आहेत. यात तीन पुरुष व चार महिला आहेत. 

औरंगाबाद : सोमवारी एकाच दिवशी 29 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर औरंगाबाद हादरले. त्यानंतर मंगळवारची (ता. २८) पहाटही औरंगाबादकरांसाठी धक्का देणारी ठरली आहे. पुन्हा मंगळवारी 13 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा 95 वर गेला असून, यात सोळा वर्षाखालील सहा मुलं आहेत, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

बाधितांपैकी 12 किलेअर्क येथील असून, एक भावसिंगपुरा येथील आहे. यात सोळा वर्षांखालील सहा मुलं, तर इतर सात जण 44 वर्षाआतील आहेत. यात तीन पुरुष व चार महिला आहेत. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

याखेरीज घाटीच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांपैकी हिंगोलीचाही एक रुग्ण पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

औरंगाबाद शहरामध्ये दोन दिवसात 42 रुग्ण 
नूर कॉलनी - 12
काळा दरवाजा - 1
किलेअर्क - 25
आसेफिया कॉलनी - 2
भावसिंगपुरा - 2

शहरात १५ मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. परदेशातून आलेल्या एका महिलेला संसर्ग झाला. त्यानंतर तब्बल १५ दिवस शहरात नवा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला; पण दोन एप्रिलला एन-४मधील एका महिलेला बाधा झाली आणि त्यानंतर आजपर्यंत (ता. २8) तब्बल 95 व्यक्ती कोरोनाग्रस्त झाल्या.

उपचार घेत असलेले रुग्ण - 66
बरे झालेले रुग्ण - 23
मृत्यू झालेले रुग्ण - 06
एकूण - 95


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Blast In Aurangabad 13 More Positive Patients One From Hingoli