कोरोना बधितांचा आकडा पाचशेच्या घरात : औरंगाबाद@४९८ 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

औरंगाबाद शहरात शनिवारी (ता.नऊ) सकाळी १७ तर दुपारी तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण बाधितांच्या आकडा ४९८ पर्यंत पोचला आहे.  शुक्रवारी (ता.आठ) दिवसभरात तब्बल १०० रुग्ण आढऴून आले होते. 

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. शुक्रवारी (ता.आठ) दिवसभरात १०० रुग्णांची भर पडली होती तर शनिवारी (ता.नऊ) सकाळी १७ तर दुपारी तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण बाधितांच्या आकडा ४९८ पर्यंत पोचला आहे. 

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी (ता.आठ) एसआरपीएफ कॅम्पमध्ये तब्बल ७२ जवानासह १८ रुग्णाचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. शनिवारी(ता. नऊ) संजयनगर-६, कटकट गेट-२ ,बाबर कॉलनी -४, भवानीनगर-२, रामनगर-१, सिल्क मिल-१ असिफिया कॉलनी-१ असे १७ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. दुपारी यात सातारा परिसर-१, तसेच पाणचक्की परिसर-१ पस्तीस वर्षीय महिला आणि जुना बाजार येथील ७५ वर्षीय पुरुष असे तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दुपारी चार वाजेपर्यंत एकूण वीस नवीन रुग्णांची भर पडली व व कोरोना बधितांचा आकडा ४९८ वर पर्यंत गेला. 

कोरोना बाधित महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म 
कोरोनाबाधित असलेल्या ३० वर्षीय महिलेने शुक्रवारी (ता.आठ) एका गोंडस मुलीच जन्म दिला आहे. बाळ आणि आई सुखरूप असून, आईस कोविड-१९ वॉर्डात हालवण्यात आले आहे, अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिली. 

घाटी रुग्णालयात ३९ रुग्णांवर उपचार 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) कोविड-१९ वॉर्डात सध्या ३९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ३६ रुग्णांची प्रकृती सामान्य असून, तीन रुग्णांची स्थिती गंभीर आहे, असे घाटी रुग्णालयातर्फे कळविण्यात आले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा

दोन महिला कोरोनामुक्त 
शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील २० व २५ वर्षीय कोविड पॉझिटिव्ह महिला रुग्णांना खासगी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे; तसेच कबीरनगरातील ३७ वर्षीय पॉझिटिव्ह पुरुष रुग्णाला जिल्हा रुग्णालयातून व रेल्वेस्थानक परिसरातील ३८ वर्षीय पॉझिटिव्ह महिला रुग्णाला महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून घाटीत गुरुवारी (ता. सात) भरती केले आहे. 

एका डॉक्टरसह कुटुंबातील चौघांना लागण 
शहरातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरसह त्यांच्या कुटुंबातील चौघांना कोविड-१९ ची लागण झाली आहे; तसेच याच रुग्णालयातील डायलिसीस सेंटरमध्ये काम करणाऱ्या सिडको एन-तीन येथील कर्मचाऱ्याला लागण झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कोरोना मीटर 
उपचार घेत असलेले रुग्ण- ४५४ 
बरे झालेले रुग्ण- ३२ 
मृत्यू झालेले रुग्ण -१२ 
एकूण-४९८ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Latest News Aurangabad