esakal | धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

गल्ल्यांमध्ये नागरिकांचे एकमेकांच्या घरात जाणे-येणे सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकाच भागात रुग्ण वाढत आहेत. आत्तापर्यंतची आकडेवारी पाहता १२ कंन्टेनमेंट झोनमधून ८० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. संजयनगर मुकुंदवाडी येथील एका घरात तब्बल ६७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 

धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोनाबाधित भाग बाहेरून बंद केल्याचा दावा प्रशासनातर्फे केला जात असला तरी या गल्ल्यांमध्ये नागरिकांचे एकमेकांच्या घरात जाणे-येणे सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकाच भागात रुग्ण वाढत आहेत. आत्तापर्यंतची आकडेवारी पाहता १२ कंन्टेनमेंट झोनमधून ८० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. संजयनगर मुकुंदवाडी येथील एका घरात तब्बल ६७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 

शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्यापासून प्रशासनामार्फत उपाय-योजना केल्या जात आहेत. मात्र रुग्णांची वाढती संख्या पाहता हे उपाय कुचकामी ठरत आहेत. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले त्या गल्ल्या बंद करण्यात आल्या आहेत. म्हणजेच नागरिकांचा एकमेकांशी संपर्क येऊ नये हे अपेक्षीत आहे.

पण या गल्ल्यांमध्ये नागरिक एकमेकांच्या घरी जात येत असल्याचे तर काही जण गल्लीत गप्पा मारत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दाट वस्तीमध्ये कोरोना झपाट्याने पसरत असल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले. संजयनगर सारख्या एका भागात शंभरावर केसेस आढळल्या. एका घरातून ६७ जण पॉझिटिव्ह आले. पुंडलीकनगर, रामनगर भागात देखील असेच चित्र असल्याचे त्यांनी सांगितले. 

नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

कोरोनामुक्त झालेल्या वसाहती 
कोरोनामुक्त झालेल्यामध्ये किराडपुरा, आरेफ कॉलनी, जलाल कॉलनी, हिलाल कॉलनी, काळा दरवाजा, पैठणगेट, शिल्लेखाना, चेलीपुरा, सावरकर चौक, मेहबूब नगर, शाहनगर व सावित्रीनगर चिकलठाणा, खडकेश्वर, अजीज कॉलनी, स्काय सिटी, कबाडीपुरा, नंदनवन कॉलनी या भागांचा समावेश आहे. 

स्थिर असलेल्या वसाहती 
काही वसाहतीमध्ये आता एक किंवा दोन रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे या वसाहती स्थिर आहेत. त्यात रोशन गेट, बिस्मिल्ला कॉलनी, एन-११ हडको, किलेअर्क, नूर कॉलनी, कैलास नगर, एन-६ विजयश्री कॉलनी या भागातून आता रुग्ण आढळण्याचे प्रमाण स्थिर झाले आहे. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

तरुणांमध्ये अधिक संक्रमण 
शहरातील एकूण रुग्णांचा विचार केल्यास त्यात २० ते ४० वयोगटातील युवकांचे प्रमाण जास्त आहेत. हे युवक घराबाहेर जाऊन कोरोना घेऊन येत आहेत. घरातील वयोवृद्ध बाधित करत आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये ६० वयोवर्षंपुढील रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे घरातील वयोवृद्धांची काळजी घ्यावी, असे आवाहन आस्तिककुमार पांडेय यांनी केले. 

go to top