कोरोनाच्या संशयाचे भूत,  अनेक ठणठणीत सामान्य त्रस्त 

अनिल जमधडे
मंगळवार, 24 मार्च 2020

रिकाम्या पंचायती करणाऱ्यांची संख्या वाढली 

औरंगाबाद : देशभरात नव्हे तर संपूर्ण जगात खळबळ माजविणाऱ्या कोरोनाच्या संशयाच्या भुताने अनेक सामान्य नागरिक त्रस्‍त झाले आहेत. अनेकजण आता एक दुसऱ्यांकडे संशयाने पाहत आहे. कुणाला साधा सर्दी, खोकला किंवा शिंक आली तरीही संशय व्यक्त करण्याचे प्रमाण वाढले आहे.  

शासन पातळीवर सातत्याने गर्दी करु नका, एकत्र येऊ नका यासह विविध सूचना दिल्या जात आहेत. मात्र मुळ सुचनेकडे दुर्लक्ष करुन रिकाम्या पंचायती करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सर्दी पडसं किंवा साधारण खोकला म्हणजेच कोरोना आहे, अशी काहीशी भावना बळावत चालल्याने अनेकजण त्रस्त झाले आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

संशय आणि चर्चा 

पुणे किंवा अन्य बाहेरगावाहून किंवा विदेशातून कुणीही आला असेल तर नागरिक गटागटाने एकत्र येऊन अशा व्यक्तीच्या विरोधात चर्चा आणि संशय व्यक्त करताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी बाहेर गावाहुन किंवा विदेशातुन आलेले परंतु ठणठणीत असलेल्या नागरिकांना या संशयाच्या भुताचा सामना करावा लागत आहे. अशा चुकीच्या चर्चा वाढत असल्याने अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

चर्चेचा होतोय त्रास 

विविध कॉलनी वसाहतीमध्ये अशा एकातरी नागरिकांबद्दल चर्चा करणे सुरू असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. कुठलाही आजार नसताना संशयाचे भूत त्रास देत असल्याने असे काही नागरिक मानसिक आजारी पडतात की काय अशी ही अवस्था निर्माण झाली आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शहरातील वासियांनी गावात येऊ नये

शहरातील नागरिकांनी गावात येऊ नये अशी भूमिका अनेक गावातील नागरिकांनी घेतली आहे. त्याचाही त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे कोरणाच्या अनुषंगाने जी काळजी घ्यायला हवी म्हणजे गर्दी करू नये, एकत्र येऊ नये या महत्त्वाच्या सूचनेकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad