जॉर्डनवरून परतलेले नऊ जण क्वारंटाईन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

जॉर्डन येथे धार्मिक कार्यासाठी जाऊन आलेले नऊ जण देखील प्रशासनाच्या टार्गेटवर आले. या नऊ जणांना मंगळवारी रात्री एक वाजता कलाग्राम येथे क्वारंटाऊन करण्यात आले आहे. याठिकाणी तब्बल १२ जण क्वारंटाईन करण्यात आले आहेत. 

औरंगाबाद : दिल्लीमधील निजामुद्दीन भागात झालेल्या तबलीग जमात सोहळ्याहून शहरात परतलेल्यांचा शोध मंगळवारपासून (ता. ३१) प्रशासन, पोलिस घेत आहे. त्यात जॉर्डन येथे धार्मिक कार्यासाठी जाऊन आलेले नऊ जण देखील प्रशासनाच्या टार्गेटवर आले. या नऊ जणांना मंगळवारी रात्री एक वाजता कलाग्राम येथे क्वारंटाऊन करण्यात आले आहे. याठिकाणी तब्बल १२ जण क्वारंटाईन करण्यात आले आहेत. 

दिल्लीच्या निजामुद्दीन भागात झालेल्या तबलीग जमात सोहळ्यात तब्बल दोन हजार जण सहभागी झाल्याचे बोलले जात आहे. यातील अनेक जण विदेशातून आलेले होते. त्यामुळे या जमातमध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाली व जमातमधून परतलेल्या अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर येताच देशभर खळबळ उडाली. ज्या-ज्या शहरातून या जमातसाठी नागरिक गेले होते, त्यांचा शोध घेतला जात आहे. दिल्ली प्रशासनाने औरंगाबाद शहरातील २९ जणांची यादी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार शोध घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करत क्वारंटाईन केले जात आहे. एकीकडे ही मोहीम सुरू असताना जॉर्डन देशातून २२ मार्चला शहरात परतलेले नऊ जण प्रशासनाच्या टार्गेटवर आले.

कोणतीही रिस्क नको म्हणून या नऊ जणांना देखील क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कलाग्राम येथे बांधकाम व्यावयासकांची संघटना क्रेडाई व हॉटेल व्यावसायिक असोसिएशनच्या सहकार्याने महापालिकेने क्वारंटाईन कक्ष सुरू केला आहे. याठिकाणी नऊ जणांना रात्री दीड वाजेच्या सुमारास क्वारंटाईन करण्यात आले. हे सर्वजण धार्मिक कार्यासाठी जॉर्डन येथे चार मार्चला गेले होते. २२ मार्चला शहरात परतल्यानंतर त्यांची स्क्रिनिंग करण्यात आली होती. असे असले तरी दिल्ली जमातच्या पार्श्‍वभूमीवर या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

आठ जणांची झाली सुट्टी 
गंगापूर (जि. औरंगाबाद) येथे जॉर्डनवरूनच आलेल्या आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. कलाग्राम येथे सध्या १२ जण क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे महापालिकेचे समन्वयक अधिकारी तथा शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad