
औरंगाबाद : शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरुवारी (ता.११) वेदांतनगर, सहकारनगर, गजराजनगर, गोविंदनगर, सुभेदारी विश्रामगृहाजवळ, हेडगेवार रुग्णालय परिसर, टीव्ही सेंटरजवळील पोलिस कॉलनी, हरिप्रसाद अपार्टमेंट हर्सूल सावंगी या नवीन भागात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. दरम्यान, तीन कंटेन्मेंट झोन घटले.
लॉकडाउन शिथिल झाल्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी आठ नव्या भागांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. बाधित रुग्णांना संपर्कातून लागण झाल्याचे समोर आले आहे. रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिकेच्या पथकाने जंतुनाशक फवारणी करून बाधित रुग्णांच्या घराजवळील परिसर सील केला आहे. नव्या भागात
रुग्ण आढळून येत असले तरी जुन्या कंटेन्मेट भागातदेखील रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यात न्यायनगर, हुसेन कॉलनी, विद्यानगर, सारंग सोसायटी, गजानननगर, हनुमानगरचा समावेश आहे. कैलासनगर भागातही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुकुंदवाडी भागातदेखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात
तीन कंटेन्मेंट झोन झाले कमी
कोरोनाचे वारंवार रुग्ण आढळून येणारे १८ भाग महापालिकेने कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले होते. यापैकी सातारा, नूर कॉलनी आणि किलेअर्क येथील नोबत दरवाज्याजवळील गल्ली असे तीन झोन कोरोनामुक्त जाहीर करण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी कंटेन्मेंट झोन वगळता शहरातील इतर भागात व्यवहार सुरळीत करण्यास मुभा दिली आहे. दरम्यान कंटेन्मेंट झोन असलेल्या १८ भागांपैकी काही ठिकाणी रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिक आणि व्यापारी दुकाने उघडण्याची वाट बघत होते. आता तीन भागांतील सर्व निर्बंध उठविले जाणार आहेत.
या भागात गेल्या २८ दिवसांत एकही रुग्ण आढळून आला नसल्यास तो भाग कोरोनामुक्त म्हणून जाहीर करण्यात येतो. शहरातील पहिला कंटेन्मेंट झोन म्हणून वॉर्ड नंबर १९ आणि २० आरेफ कॉलनी, आसेफिया कॉलनी, जयभीमनगर जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी वॉर्ड १९ हा पूर्णपणे कंटेन्मेंटमुक्त झाला आहे. यातील हिलाल कॉलनी, जलाल कॉलनी, बिस्मिल्ला कॉलनी आयुब कॉलनी, आरेफ कॉलनी कोरोनामुक्त झाले. मात्र वॉर्ड क्रमांक २० अद्यापही कंटेन्मेंट झोनमध्येच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.