कोरोना अजून संपलेला नाही! आठशे जणांत १२१ पॉझिटीव्ह, दोन ते तीन टक्के झाली वाढ

20navi_20mumbai_6_1
20navi_20mumbai_6_1

औरंगाबाद : दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा कमी होताना दिसतो. पण याचा अर्थ कोरोना संपतोय, धोका टळतोय असा नाही. उलट बाधित होण्याच्या प्रमाणात पूर्वीपेक्षा दोन ते तीन टक्के वाढ झाल्याची बाब आकड्यातून समोर आली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तीन हजार लोकांत तीनशे ते साडेतीनशे जण बाधित होत. पण आता आठशे जणांतच १२१ इतके बाधित होत आहेत. त्यामुळे धोका टळतोय, असा समज करता कामा नये.


शहराच्‍या प्रवेशद्वारावर, शहर व ग्रामीण भागातील मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाकडून तसेच ठिकठिकाणच्या केंद्रात केल्या जाणाऱ्या कोरोना चाचणी (आरटीपीसीआर व ॲन्टीजेन) मिळुन ऑगस्ट-सप्टेंबरअखेरीस दरदिवशी सुमारे तीन हजार चाचण्या केल्या जात होत्या. या चाचण्यांमध्ये बाधितांचे प्रमाण १२ ते १४ टक्के होते. एकाच दिवशी ३०० पेक्षा अधिक जणांची चाचणी पॉझिटीव्ह येणे म्हणजेच त्यावेळी संसर्ग वाढता होता. पण आताही ही टक्केवारी आणखी खाली आली असा समज होता कामा नये. दरदिवशी होणाऱ्या चाचण्यांची संख्या व त्यात बाधितांचे प्रमाण १७ टक्क्यांजवळ पोचले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. सतरा टक्क्यांपर्यंत बाधितांचे प्रमाण असले तरी ते पुर्वीच्या तुलनेत अधिकच आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे.

उदासीनता नको
कोरोनाचे आकडे कमी दिसत असल्याने आता बहूसंख्य नागरिक मास्क घालण्यात दिरंगाई करताना दिसून येत आहेत. विविध प्रतिष्ठाणे, काही खानावळी व इतर ठिकाणी मास्कचा वापर तुरळक होताना पाहायला मिळतो. मास्क वापरण्याची दिरंगाई भोवण्याची शक्यता अधिक वाढते त्यामुळे सर्व गोष्टींची काळजी घ्यायला हवी.


म्हणून गांभीर्य संपतेय
कोरोना काळात लॉकडाऊनचाही अनुभव सर्वांनी घेतला. जसे जसे जनजीवन सुरळीत होत गेले तसे कोरोनाचे गांभीर्य कमी होत आहे. भिती दुर होणे ही चांगली बाब आहे मात्र गांभीर्य संपत जाणे म्हणजे पुन्हा एखाद्या लाटेला निमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे शासनाने घातलेली बंधने सैल झाली असली व आकडे कमी दिसत असले तरीही जागृती बाळगुन या विषाणुला सहज घेता कामा नये.

बाधित होण्याची सरासरी वाढतीच
-----------------------------------------------------------------------------------
तारीख  : अन्टीजेन : आरटीपीसीआर : एकुण : बाधितांचा आकडा व टक्केवारी
------------------------------------------------------------------------------------
२० ऑक्टोबर : ४३५ : २७३ : ७०८ : १५६ (२२. ०३ टक्के)
-------------------------------------------------------------------------------------
२१ ऑक्टोबर : ४५९  : ३३१ :  ७९० : १५७ (१९. ८७ टक्के)
-------------------------------------------------------------------------------------
२२ ऑक्टोबर  :  ३८४  : ३०५  :  ६८९ : १०२ (१४. ८० टक्के)
--------------------------------------------------------------------------------------
२३ ऑक्टोबर  :  ३९७  : ४०४  : ८०१  :  १२१ (१५. १० टक्के)

Editied - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com