esakal | मारहाणीचा बदला घेतला खून करून! पोलिसांनी २४ तासात गुन्हा केला उघड
sakal

बोलून बातमी शोधा

3crime_201_163

विक्षिप्त वागणाऱ्याने केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी त्याच्या घरात ‘ओल्या पार्टी’चे आयोजन करून त्याच्याच घरातील तिक्ष्ण हत्याराने त्याच्यावर सपासप वार करून बदला घेतला!

मारहाणीचा बदला घेतला खून करून! पोलिसांनी २४ तासात गुन्हा केला उघड

sakal_logo
By
रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : विक्षिप्त वागणाऱ्याने केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी त्याच्या घरात ‘ओल्या पार्टी’चे आयोजन करून त्याच्याच घरातील तिक्ष्ण हत्याराने त्याच्यावर सपासप वार करून बदला घेतला! भीमराव सावते याचा २० वर्षीय मारेकरी कृष्णा सूर्यभान ताठे याने हा खून केला आणि पोलिसांना कबुलीही दिली. त्यामुळे रांजणगाव येथील खुनाचे कोडे उलगडले. घटनेनंतर चोवीस तासाच्या आत ही कारवाई पोलिसांनी केली.

अटक न करण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेणारा पीएसआय 'एसीबी'च्या जाळ्यात 


रांजणगाव (शेणपुंजी) येथील मातोश्रीनगरात राहणारा भीमराव दिगंबर सावते (वय ३५) याचा तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला होता. ही घटना बुधवारी (ता.२१) सायंकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत आरोपीची ओळख व त्याचा माग काढण्यासाठी धागेदोरे जमा केले. त्यात त्यांना आरोपी हा मित्रासोबत पुण्याला गेल्याचे समजताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पुणे येथे जाऊन आरोपीच्या मुसक्या बांधल्या. यावेळी पोलिसांनी त्याला खाक्या दाखविताच त्याने खूनाची कबुली दिली. त्याने सांगितले, की भीमराव सावते हा विक्षिप्त होता, गेल्या तीन दिवसापूर्वी त्याने मला मारहाण केली होती.

बोगस बियाणांच्या तक्रारीनंतर आता शेतातच तयार होणार सोयाबीनचे सरळ बियाणे!

या मारहाणीचा बदला घेण्यासाठी मी त्याच्याच घरात ओल्या पार्टीचे आयोजन केले. त्याला जास्त दारू पाजून मी त्याच्या घरातील खंजीर काढून सावते याच्या गळ्यावर, मानेवर, पोटावर, मांडीवर व डोक्यावर सपासप वार केले. तो निपचित पडताच याची दुचाकी व मोबाईल घेऊन पळून गेलो. खुनाची कबुली देताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी आरोपी कृष्णा सर्जेराव ताठे वय २० रा.शिरसाळा ता. परळी जि. बीड याला अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गंभिरराव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर, पोलीस विनोद परदेशी, दिपक मतलबे, शिपाई धनेधर यांनी केली.

पोलिस आयुक्तांकडून शाबासकीची थाप
गुन्ह्यातील आरोपी कोण व त्याने कशासाठी भीमराव सावते याचा खून केला. हा पेच पोलिसांसमोर उभा होता. मात्र वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी आपल्या टीमला मार्गदर्शन करीत धागेदोरे शोधून काढले. या आधारे आरोपीला चोवीस तासाच्या शोधून काढून अटक केली. याबद्दल पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन शुक्रवारी शाबासकीची थाप दिली.

मोबाईल व दुचाकी विकली
आरोपी ताठे याने सावते याचा खून केल्यानंतर जोगेश्वरी येथे गेला. त्यानंतर तो एका कंपनीत रात्रभर थांबला. दुसऱ्या दिवशी तो एका मित्राला सोबत घेऊन प्रथम औरंगाबादला गेला. तेथे त्याने मृताचा मोबाईल विकून दुचाकीत पेट्रोल भरले. त्यानंतर तो थेट पुण्याला गेला. तेथे आठ हजार रुपयाला मृताची दुचाकी विकली. त्यानंतरही तो फरार होण्याच्या प्रयत्नात असतानाच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.
 

Edited - Ganesh Pitekar

go to top