Corona Updates: मागील २४ तासांत जिल्ह्यात ३२ रुग्णांची वाढ; जाणून घ्या आकडेवारी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

आज एकूण ३२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६७९५ झाली आहे

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज ४८ जणांना (मनपा ४०, ग्रामीण ०८) सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत ४५४३८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण ३२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६७९५ झाली आहे.

आजपर्यंत एकूण १२३२ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. 

पंकजा मुंडे काय म्हणाल्या वाचा सविस्तर- 'आम्ही आयुष्यभर सत्तेबाहेरच राहिलो, संघर्ष हाच आमच्या जीवनाचा मूलमंत्र...

मनपा (२८) छत्रपती चौक, बजाजनगर (१), गणेश नगर, सिडको (१),विठ्ठल रुक्मीणी मंदीर परीसर(१), ब्रिजवाडी (१), उत्तरा नगरी (१), विजय नगर (१), भारतमाता नगर (१), ज्योती नगर (१), उल्कानगरी (१), बीडबाय पास (२),अन्य (१७), ग्रामीण (४) खामगाव, फुलंब्री (१), अन्य (३) 

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू- 
घाटीत सिडको कॉलनीतील ६६ आणि कन्नड तालुक्यातील जामडी येथील ५६ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona updates in aurangabad district covid corona virus