esakal | COVID-19 : पैठण शहरात कोरोनाचा शिरकाव, या भागात आढळला रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona's first patient at Paithan

यशवंतनगर भागातील एका ४० वर्षीय व्यक्तीला बाधा 

COVID-19 : पैठण शहरात कोरोनाचा शिरकाव, या भागात आढळला रुग्ण

sakal_logo
By
चंद्रकांत तारू

पैठण (जि. औरंगाबाद) : शहरातील यशवंतनगर भागातील एका ४० वर्षीय व्यक्ती कोरोनाची लागण झाली. त्यामुळे शहरात पहिला रुग्ण सापडला आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके  यांनी हा भाग सील करून या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ९० जणांना होम क्वारंटाइन केले आहे. शिवाय १३ जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. 

या रुग्णाला दोन दिवसांपूर्वी छातीत त्रास होत होता. त्यामुळे त्यांना औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही माहिती औरंगाबाद महापालिकेने तालुका प्रशासनाला दिली. यानंतर तहसीलदार शेळके, सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप रगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय वाघ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी या भागाला भेट देऊन पाहणी केली. ९० जणांना होम क्वारंटाइन केले. वैद्यकीय पथक त्यांची रोज आरोग्य तपासणी करणार आहे. मुख्याधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या भागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. 
  
दक्षता घेण्याचे प्रशासनाचे जनतेला आवाहन 
कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने तालुका प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे. स्वच्छता राखावी, विनाकारण बाहेर पडू नये, गरज असेल तर मास्क लावूनच बाहेर जावे. घाबरून जाऊ नये अशा सूचना शहरात भोंगा फिरवून दिल्या जात आहेत. बाधिताची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 

सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे
 
यापूर्वी बाधित राहून गेला होता 
औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील कोरोना बाधित ब्रदर येथे त्याच्या नातेवाइकाकडे राहून गेला होता. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. परंतु, कोरोनापासून दूर असलेल्या पैठणमध्ये अखेर कोरोनाचे प्रवेश केलाच. त्यामुळे खळबळ उडाली आहे. 
 
घाटी रुग्णालयात ३३ रुग्णांची प्रकृती गंभीर 
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे उपचार घेणारे ३३ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर ७५ रुग्णांची स्‍थिती सामान्य आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयातील माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. 

घाटीत एक जूनला सायंकाळी चार ते दोन जून सायंकाळी चारपर्यंत एकुण ६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील ४६ रुग्णांच्या लाळेची चाचणी घेण्यात आली. त्यातील १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. सात रुग्णांचे अहवाल कोवीड निगेटीव्ह आले, तर २३ रुग्णांचे अहवालाची अजून प्रतीक्षा आहे. सामान्य स्थितीत ७५ रुग्ण असुन ३३ गंभीर रुग्णांवर शर्थीचे उपचार सुरु आहेत. आयसीएमआरच्या नियमावलीनुसार, दोन पॉझिटीव्ह रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. यात शिवशाहीनगर, मुकुंदवाडी येथील ४८ वर्षीय महिला व २५ वर्षीय शासकीय महाविद्याल परिसरातील पुरुषाला सुटी देण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत