Coronavirus : औरंगाबादेत दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर, ३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : शहरात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याच्या घटनेनंतर गेल्या दोन दिवसांत कित्येक संशयितांनी स्वॅब टेस्टसाठी मिनी घाटीत रांगा लावल्या आहेत. त्यांचे स्वॅबचे नमुने घाटीच्या प्रयोगशाळेत तपासले जात असून, ३७ पैकी ३४ निगेटिव्ह आले आहेत. सध्या दाखल दोन कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. 

पुण्याहून परतलेल्या एका २१ वर्षीय तरुणाला तसेच शहरात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय गृहिणीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना मिनी घाटीत साकारलेल्या विशेष कोरोना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. या दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यामुळे कुठल्याही उलटसुलट अफवेवर विश्वास ठेवू नका, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

शहरात १३ मार्च रोजी एका ५९ वर्षीय प्राध्यापक महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या महिलेवर खासगी रुग्णालयात यशस्वी उपचार केल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. सध्या त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. मात्र, त्यानंतर हे दोन रुग्ण सध्या कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मिनी घाटीत तपासणीसाठी गर्दी

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमातच्या मरकजला गेलेल्यांची कोरोनाची तपासणी सध्या मिनी घाटीत सुरू आहे. त्याचबरोबर जिल्हाभरातून संशयित रुग्णांनाही स्वॅबचे नमुने देण्यासाठी मिनी घाटीतच पाठवले जात आहेत. या सर्वांची तपासणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नव्याने उभारलेल्या प्रयोगशाळेत सुरू आहे. 

३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह

जिल्हा शल्यचिकित्सकांनी पाठवलेल्या ३७ पैकी ३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी तीन जणांचे अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत मिळण्याची शक्यता असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com