पाऊन तासात औरंगाबादेत कोरोनाचे दोन बळी, आतापर्यंत एकुण २३ बळी

Friday, 15 May 2020

बायजीपुरा गल्ली क्रमांक ३२, येथील ७० वर्षीय पुरुषाला १० मे रोजी दुपारी सव्वा दोन वाजता घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचा कोवीड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आला होता.

औरंगाबाद - औरंगाबादेत कोरोनाकंप सुरुच असताना कोरोनाचा मृत्युतांडवही सुरु आहे. आज (ता. १५) दुपारी तीन ते पाऊने चारदरम्यान पाऊन तासात दोन पॉझिटीव्ह रुग्णांचा बळी गेला आहे. अशी माहीती शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. आता औरंगैबादेत कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या २३ वर पोचली आहे.

७४ वर्षीय कोवीड पॉझिटीव्ह पुरुष (रा. दुर्गा माता मंदीराजवळ, नवीन हनुमाननगर) यांना जिल्हा रुग्णालयातून घाटी रुग्णालयात १५ मे रोजी दुपारी दोन वाजता भरती केले.

त्यांच्यावर अतीदक्षता विभागात तातडीने उपचार सुरु करण्यात आले. परंतु त्यांचा बायलॅट्रल न्युमोनीया ड्युटु कोवीड-१९ इन नोन केस ऑफ क्रोनिक ऑफस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज विथ हायपर टेन्शन या कारणामुळे पाऊने चारच्या सुमारास मृत्यु झाला. 

बायजीपुरा गल्ली क्रमांक ३२, येथील ७० वर्षीय पुरुषाला १० मे रोजी दुपारी सव्वा दोन वाजता घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचा कोवीड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आला होता.

नियमावलीप्रमाणे त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. परंतु त्यांचा आज १५ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास बॉयलॅट्रल न्युमोनिया विथ ॲक्युट रेस्पायरेटरी डिस्ट्रेस सिड्रोंम विथ मल्टी ऑर्गन डिसफक्शन इन कोवीड-१९ विथ हायपर टेंशन ॲन्ड इसचेमीक हार्ट डिसीज या कारणाने त्यांचा मृत्यू झाला. हे दोन्ही कोरोना व ईतर आजाराचे २२ व  २३ वे बळी ठरले आहेत.

सिडकोत हवाई सुंदरीला कोरोनाची बाधा 

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा फैलाव सुरूच असून, शुक्रवारी सिडको एन- ६, सादातनगर, हिमायतनगर, न्यू हनुमान कॉलनी, अमर सोसायटी या नवीन वसाहतींमध्ये रुग्ण आढळून आले. यात पुणे येथून आलेल्या एका हवाई सुंदरीचा देखील समावेश आहे. 

शहरातील रोज नवनवीन भागांत रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारपर्यंत कोरोनाबाधित भागाची संख्या ७६ वर पोचली होती. शुक्रवारी त्यात पुन्हा पाच ते सहा वसाहतींची भर पडली. सिडको एन-६ मध्ये दोन बाधित रुग्ण आढळून आले असून, संपर्कातल्या संपर्कातून लागण झाल्याचे समोर आले आहे. सादातनगर भागात एक रुग्ण आढळून आला आहे; तसेच हिमायतनगरमध्ये पाच रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चाऊस कॉलनी, अमर सोसायटी, न्यू हनुमाननगर, हुसेननगर या भागांतही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. सिडको एन-८ मध्ये काल गुरुवारी आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये एक हवाई सुंदरी कोरोनाबाधित निघाली आहे. पुणे येथून आलेल्या या हवाई सुंदरीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन ध्वनिक्षेपणावरून केले जात आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus In half an hour, two patients died in Aurangabad due to corona