esakal | आता औरंगाबाद हादरले : एकाच दिवसात नवीन सात रुग्णांची भर
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

आता शहरात कोरोना बाधितांचा आकडा दहावर पोचला असला, तरी यापैकी ५९ वर्षीय प्राध्यापिका उपचारानंतर बरी झाली. तसेच एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे सध्या आठ जणांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून देण्यात आली. 

आता औरंगाबाद हादरले : एकाच दिवसात नवीन सात रुग्णांची भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात ५५ वर्षीय महिला आणि २१ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्यानंतर रविवारी (ता. पाच) औरंगाबादला चांगलाच हादरा बसला. सकाळी एका ५८ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर दिवसभरात शहरातील तब्बल सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. यामध्ये एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरसह सात वर्षीय मुलीचाही समावेश आहे.

आता शहरात कोरोना बाधितांचा आकडा दहावर पोचला असला, तरी यापैकी ५९ वर्षीय प्राध्यापिका उपचारानंतर बरी झाली. तसेच एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे सध्या आठ जणांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून देण्यात आली. 

घाटीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्याचबरोबर जलाल कॉलनी हिमायतनगर येथील ७९ वर्षीय वृद्धालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर असून, त्याला घाटीतून चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सात जणांवर, तर एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अहवाल पॉझिटीव्ह आल्याने धक्का 

गुरुवारी (ता. दोन) शहरात सिडको एन-चार आणि आरेफ कॉलनी येथील तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. रविवारी आणखी सहा संशयितांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरात आणखी जास्त खबरदारी घेतली जात आहे. सिडको एन-४ येथील एका सात वर्षीय मुलीस कोरोनाची लागण झाली आहे. या मुलीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर आहे. 

औरंगाबादेतील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

त्याचबरोबर आरेफ कॉलनी येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील ४५ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच जलाल कॉलनी, अहबाब कॉलनी, पदमपुरा येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या व्यक्तींच्या संपर्कातील लोकांची माहिती घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे.

जॉर्डनहून परतलेला पॉझिटिव्ह

शहरात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले; तसेच कटकट गेट रस्त्यावरील अहबाब कॉलनी येथे राहणारा ३७ वर्षीय तरुण असून, १५ दिवसांपूर्वी तो जॉर्डन येथून परतला होता. पद्मपुरा येथील ४३ वर्षीय व्यक्तीलाही बाधा झाली.

जलाल कॉलनी येथे आढळून आलेला एक रुग्ण हा रहेमानिया कॉलनी येथे राहत होता. नंतर ते त्याच्या मुलाकडे जलाल कॉलनी येथे राहायला गेला. त्यामुळे रहेमानिया कॉलनी, किराडपुरा तसेच परिसर सील करण्यात आला आहे.

Coronavirus Positive 10 New Patients In Aurangabad Breaking News