Admission अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी ॲप...

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद ः दरवर्षी मे महिन्यातच दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीची प्रवेश प्रकिया सुरू होते. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरात लॉकडाउन आहे. लॉकडाउनमुळे अद्याप दहावी, बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम झालेले नाही. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. परिणामी, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब लागण्याची शक्यता आहे.

 याच पार्श्‍वभूमीवर शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशासाठी ॲप तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सद्यःस्थितीत अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवणे शक्य नाही. म्हणून अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण मंडळाकडून नुकतीच व्हीसीद्वारे मिटिंग घेण्यात आली. यामध्ये अकरावी प्रवेशाबाबत अडचणींवर कशी मात करता येऊ शकेल याबाबत चर्चा झाली. 

राज्यात सहा झोनपैकी सध्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर नागपूर व अमरावतीमध्येही दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सध्यातरी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवणे शक्य होणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरळीत करता यावी, यासाठी शिक्षण विभागाकडून एका ॲपची निर्मिती करण्यात येत आहे. या ॲपद्वारे मुलांना घरी बसून प्रवेश प्रक्रिया पार पाडता येणार आहे. यात विविध शाखा निवड करणे, प्रवेश शुल्क भरणे अशा सुविधा मुलांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. 

दहा जूननंतर प्रवेश 
सुरू होण्याची शक्यता
 
अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अर्जाचा एक भाग; तर दहावीच्या निकालानंतर अर्जाचा दुसरा भाग-२ भरण्यास सुरवात होते. दरवर्षी दहावीचा निकाल मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. परंतु यंदा कोरोनामुळे पहिली ते नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. तसेच दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला. परिणामी, लॉकडाउनमुळे पेपर तपासणीचे काम रखडले. 

परंतु, दहा जूनपर्यंत दहावी, बारावीचा निकाल जाहीर करावा, असे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे मंडळाकडून निकाल लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दहा जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया ॲपच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सकाळ शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com