esakal | पैठणच्या एकनाथ महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे औपचारिक प्रस्थान
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus Updates Formal departure of Eknath Maharaj Palkhi Dindi ceremony Aurangabad

कोरोनाच्या महामारीमुळे आषाढी यात्रा रद्द करण्यात आली असली तरी पंढरीच्या वारीची मोठी परंपरा असलेल्या पैठण येथील शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराजांच्या यांच्या पालखी दिंडी सोहळ्याचे औपचारिक प्रस्थान शुक्रवारी (ता.१२) झाले.

पैठणच्या एकनाथ महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे औपचारिक प्रस्थान

sakal_logo
By
चंद्रकांत तारु

औरंगाबाद ः कोरोनाच्या महामारीमुळे आषाढी यात्रा रद्द करण्यात आली असली तरी पंढरीच्या वारीची मोठी परंपरा असलेल्या पैठण येथील शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराजांच्या यांच्या पालखी दिंडी सोहळ्याचे औपचारिक प्रस्थान शुक्रवारी (ता.१२) झाले. दरम्यान, शासन निर्देश येईपर्यंत दिंडी प्रस्थान पालखीचा पैठण येथे नाथांच्या समाधी मंदिरात मुक्काम राहणार आहे. त्यानंतर शासनाच्या सुचनेनुसार एक जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशीला नाथांच्या पादुकांचा सोहळा मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत दाखल होणार आहे. यात्रा होणार नसल्यामुळे वारकरी व भाविकांच्या मनोमनी त्या विठ्ठलाचे रुप पाहण्याची उर्मी प्रस्थान प्रसंगी दाटुन आली होती. 

प्रसंगी रितीरिवाजानुसार ठरल्या प्रमाणे नाथांच्या वाडा मंदिरात सकाळी नाथांच्या पादुकांचे विधिवत पुजन करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांनी अभंगवाणी करुन नाथांचा जयजयकार करीत टाळ मृदंगाच्या गजरात पालखी खांद्यावर घेवुन टाळ गोदाकाठी पालखी ओटा येथे आणली. यावेळी भाविकांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने घालुन दिलेल्या शारिरिक अंतरासह सर्व नियम पाळुन पालखीतील नाथ पादुकांचे दर्शन घेतले. गर्दीचे बंधन असल्यामुळे जेमतेम भाविकांची उपस्थिती होती. यावेळी ओटा येथुन पालखी नाथांच्या समाधी मंदिरात आणण्यात आली.


प्रस्थान प्रसंगी नाथवंशज तथा पालखी दिंडी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी, नगराध्यक्ष सुरज लोळगे, उपनगराध्यक्ष सुचित्रा जोशी,  नाथमंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार चंद्रकांत घोडके, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य विलास भुमरे, ज्ञानेश्वर कापसे, नगरसेवक बादशाह परळकर, तुषार पाटील, भुषण कावसनकर, सिद्धार्थ परदेशी, विष्णु मिटकर, प्रशांत जगदाळे, नगर परिषद मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, तालुका अधिकारी डॉ. विजय वाघ, पोलिस उप अधीक्षक गोरक्ष भामरे, पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख आदींची उपस्थिती होती.

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  


कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे यंदाचा परंपरेनुसार नाथांचा विधीवत दिंडी प्रस्थान सोहळा पार पाडण्यात आला. पायी दिंडी सोहळा होणार नसुन एक जुलै २०२० रोजी आषाढी एकादशी यात्रेला पंढरपुरला दर्शनासाठी शासनाने दिलेल्या नियम, अटीच्या परवानगीनुसार पालखी पादुका सोहळा नेण्यात येणार आहे.  
- रघुनाथ महाराज गोसावी, नाथवंशज तथा पालखी सोहळा प्रमुख, पैठण.