CoronaUpdate : औरंगाबादेत १०५ जण कोरोनाबाधित, तीन हजार ३०१ रुग्णांवर उपचार सुरू

मनोज साखरे
Sunday, 11 October 2020

औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी आज (ता. १०) १०५ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली.

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी आज (ता. १०) १०५ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ३५ हजार २१२ झाली. आजपर्यंत एकूण ९९५ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ३ हजार ३०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथका २९ व ग्रामीण भागात १६ रुग्ण आढळले. आज ३३२ जणांना सुटी झाली. यात शहरातील २१५ व ग्रामीण भागातील ११७ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ३० हजार ९१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

गोंधळलेल्या परीक्षा विभागामुळे विद्यार्थ्यांची होतेय ससेहोलपट; लॉगीन, नेटवर्क, मॉक टेस्टच्या अडचणी

शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या)
मार्ड हॉस्टेल परिसर (१), सुधाकर नगर (१), जयभवानी नगर (१), पवन नगर (१), हडको परिसर (१), शिवनेरी कॉलनी, टीव्ही सेंटर (१), घाटी परिसर (१), एन-नऊ परिसर (४), बीड बायपास परिसर (१), एन एक सिडको (३), एन-दोन सिडको (१), समर्थनगर (१), एसटी क्वार्टर परिसर (१), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (२), सिडको (१), एसटी कॉलनी (१), गारखेडा परिसर (२), कृष्णा रेसिडन्सी, अदालत रोड (१), भगतसिंग नगर (१), एन-तीन सिडको (१), गरमपाणी परिसर (१), ब्रिजवाडी, एमआयडीसी परिसर (२), अरिहंत नगर (१), टीव्ही सेंटर (१), जेजे प्लस हॉस्पीटल परिसर (१), एमजीएम हॉस्टेल परिसर (१), मेहेर नगर (२), सारा गार्डन परिसर, एन-दोन (१), शहानूरवाडी परिसर (१), रामा हॉटेल परिसर (३), ग्रीन ऑलिव्ह हॉटेल परिसर (१), ब्ल्यू हेवन परिसर (१)

कोरोना लसीकरणासाठी कृती आराखडा पाठवा, औरंगाबाद महापालिकेला शासनाने दिले आदेश

ग्रामीण भागातील बाधित
औरंगाबाद (३), गंगापूर (३), कन्नड (७), वैजापूर (१), पैठण (२), टाकळी सिल्लोड (१), देवगाव रंगारी, कन्नड (१), दिनापूर, पैठण (१), गंगोत्री पार्क, वडगाव कोल्हाटी (१), साई नगर, वडगाव (१), घोसला, सोयगाव (१), तीसगाव (१), चिकटगाव, वैजापूर (१), कारखाना परिसर, कन्नड (१), मेन रोड, कन्नड (१), करंजखेड, कन्नड (१), शेंद्रा (१), साई एकनाथ हॉस्पीटल परिसर, पैठण (१), तुर्काबाद, गंगापूर (१), मारोती चौक परिसर, गंगापूर (१), भायगाव, वैजापूर (१), जळगाव, कन्नड (१)

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 105 Positive Cases Reported In Aurangabad