esakal | कोरोना लसीकरणासाठी कृती आराखडा पाठवा, औरंगाबाद महापालिकेला शासनाने दिले आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

0corona_20vaccine_0

कोरोनावर लस शोधण्यात अद्याप यश आले नसले तरी संशोधन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लसीकरणासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी केली जात आहे.

कोरोना लसीकरणासाठी कृती आराखडा पाठवा, औरंगाबाद महापालिकेला शासनाने दिले आदेश

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोनावर लस शोधण्यात अद्याप यश आले नसले तरी संशोधन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लसीकरणासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी केली जात आहे. महापालिकेला कृती आराखडा तयार करून माहिती पाठविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. लसीकरणासाठी काय तयारी करावी लागेल, किती कर्मचारी लागतील, याची माहिती १६ ऑक्टोबरपर्यंत पाठविली जाणार आहे.

गोंधळलेल्या परीक्षा विभागामुळे विद्यार्थ्यांची होतेय ससेहोलपट; लॉगीन, नेटवर्क, मॉक टेस्टच्या अडचणी


शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्याप संपलेला नाही, असे सांगितले जात आहे. दुसरी लाट येऊ शकते, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लसीविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. सध्या भारतासह विदेशात लसींच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. काही ठिकाणी संशोधन अंतिम टप्प्यात आहे.

त्यामुळे कोरोनावर लवकरच लस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणून शासनाने देखील लसीकरणाची पूर्वतयारी सुरू केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने महापालिकेला लसीकरणासाठीचा कृती आराखडा सादर करण्याची सूचना केली आहे. या आदेशानंतर आरोग्य विभाग कामाला लागला असून, १६ ऑक्टोबरपर्यंत आराखडा सादर करण्याची मुदत असल्याने या मुदतीत प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

पावसामुळे पिके हातची गेल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या


लसीकरणासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून, शासनाने कृती आराखडा तयार करून प्रस्ताव मागविला आहे. यामध्ये शिबिर, लसीकरणासाठी किती कर्मचारी लागतील, यासह इतर माहिती द्यावी लागणार आहे.
- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.


संपादन - गणेश पिटेकर