Corona Update : पुन्हा दीडशे कोरोनाबाधित! औरंगाबाद जिल्ह्यातील चित्र

मनोज साखरे
Saturday, 28 November 2020

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून चाचण्या वाढविल्यामुळे बाधितांची संख्या वाढत आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून चाचण्या वाढविल्यामुळे बाधितांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (ता.२७) आणखी १५० रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या ४३ हजार ६४ झाली. सध्या ९०१ जणांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या १०४ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४१ हजार २० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार १४३ जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील बाधित
परिसर, (कंसात रुग्णसंख्या) : उस्मानपुरा (१), एमजीएम कॉलेज रोड सेव्हन हिल परिसर (१), प्रफुल्ल हौ.सो. (५), एन सहा सिडको (१), समर्थनगर, क्रांती चौक (१), एन सात जयलक्ष्मी कॉलनी (१), युनिव्हर्सिटी कॅम्प (१), साक्षी रेसिडियन चिकलठाणा (१), समाधान कॉलनी (३), पोलिस कॉलनी (२), खुराणानगर (१), विजयनगर (१), न्यायनगर (१), शिवशंकर कॉलनी (३), बीड बायपास परिसर (२), शिवाजीनगर, सिडको निर्मल हॉस्पिटल (२), एन एक सिडको (१), नॅशनल कॉलनी (१), शिवाजीनगर एन नऊ सिडको (१), नागेशवाडी (१), चिकलठाणा (१), रोकडिया हनुमान कॉलनी (३), राधामोहन कॉलनी (१), अरिहंतनगर (१), नाईकनगर, देवळाई (१), कासारी बाझार (२), एन तीन सिडको (१), देशमुख निवास (१), हडको (१), बेगमपुरा (१), कांचनवाडी (१), देवगिरी हॉस्टेल (१), बजरंग कॉलनी (१), भारतनगर, गारखेडा (१), समर्थनगर (२), साई शंकर खडकेश्वर (२), हनुमाननगर (१), बीड बायपास परिसर (३), परिमल हौसिंग सोसायटी (१), उल्कानगरी (१), एकनाथनगर, उस्मानपुरा (१), एन सात सिडको (१), मयूर पार्क, शिवेश्वर कॉलनी (१), वसंतनगर (१), एन सात बजरंग कॉलनी (१) जाधववाडी (१) अन्य (६३).

ग्रामीण भागातील बाधित : कन्नड (१) डोणगाव, करमाड (१), पोलिस कॉलनी, साजापूर (१), देवगाव रंगारी, कन्नड (१) अन्य (१९).

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 150 Cases Reported In Aurangabad