
औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता. सात) कोरोनाची ५२ जणांना लागण झाली. रुग्णसंख्या ४३ हजार ९८४ झाली. ८५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी (ता. सात) कोरोनाची ५२ जणांना लागण झाली. रुग्णसंख्या ४३ हजार ९८४ झाली. ८५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४१ हजार ९७१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार १५९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शहरातील बाधित
परिसर, (कंसात रुग्णसंख्या) ः एन-२ सिडको (२), रेल्वे स्टेशन परिसर (३), सिडको महानगर (१), इंद्रप्रस्थ हाउसिंग सोसायटी (४), उत्तमनगर (१), अशोकनगर (३), सिडको बसस्टँड परिसर (१), राधाकृष्ण मंदिराजवळ, क्रांतीचौक (१), हडको परिसर (१), अन्य (२४).
ग्रामीण भागातील बाधित ः सिल्लोड पोलीस ठाणे परिसर (१), अन्य (१०).
BharatBandh : औरंगाबाद शहरातील अर्धेअधिक व्यापारी आस्थापना राहणार बंद
दिवसभरात २२३ प्रवाशांची चाचणी
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेतर्फे चिकलठाणा विमानतळ व रेल्वेस्टेशनवर सचखंड एक्सप्रेसने येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. रेल्वेस्टेशनवर सोमवारी (ता. सात) १८७ प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. रविवारी (ता. सहा) केलेल्या २०८ चाचण्यांतून एकही पॉझिटिव्ह आढळला नाही. विमानतळांवर दिवसभरात ३६ विमान प्रवाशांचे स्वॅब घेण्यात आले. काल घेतलेल्या २७ स्वॅबमधून एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे आरोग्य विभागाने कळविले.
Edited - Ganesh Pitekar