esakal | Corona Update : औरंगाबादेत ५७ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४२ हजार ५१२ कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

2coronavirus_63

औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी (ता.१२) ५७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ३०७ झाली.

Corona Update : औरंगाबादेत ५७ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४२ हजार ५१२ कोरोनामुक्त

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी (ता.१२) ५७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ३०७ झाली. आजपर्यंत एकूण एक हजार १६९ जणांचा मृत्यू झाला. सध्या ६२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज १३८ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४२ हजार ५१२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मोठी खुर्ची हटवून मुख्यमंत्री ठाकरे बसले साध्या खुर्चीवर, आपणही सामान्य असल्याचा दिला संदेश


शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या)
एन चार विवेकानंद नगर (१), गणेश नगर सो., एन आठ (१), जाधववाडी (१), पडेगाव (१), सहानी नगर (२), नवजीवन कॉलनी (१), एन नऊ हडको (१), एन दोन ठाकरे नगर (२), संजय नगर (१), सिडको बसस्टँड परिसर (१), बसय्यै नगर (१), म्हाडा कॉलनी, रिलायन्स मॉल जवळ (१), टीव्ही सेंटर (१), पैठण रोड (१), अन्य (२९)

ग्रामीण भागातील बाधित

ऑरेंज प्राइड, वाळूज (२), विष्णू नगर, कन्नड (१), बजाज नगर (१), अन्य (८)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

औरंगाबादेत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यातील एक रुग्ण बुलढाण्यातील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार १६९ जणांचा मृत्यू झाला. घाटी रुग्णालयात शहापूर घोडेगाव (जि. औरंगाबाद) येथील ४५ महिलेचा ११ डिसेंबरला पहाटे सव्वा तीनच्या सुमारास मृत्यू झाला. जाम (जि. बुलढाणा) येथील ५८ वर्षीय पुरुषाचा शनिवारी (ता. १२) सकाळी सव्वा सातच्या सुमारास मृत्यू झाला.
 


कोरोना मीटर
----------
बरे झालेले रुग्ण ः ४२५१२
उपचार घेणारे रुग्ण ः ६२६
एकूण मृत्यू ः ११६९
------------------
आतापर्यंतचे बाधित ः ४४३०७
---------------

Edited - Ganesh Pitekar