
औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता.३१) ६० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता.३१) ६० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ६०४ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २०५ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ४५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६८ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार ९४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : व्यंकटेश कॉलनी (१), रॉक्सी सिनेमा गृहाजवळ (१), संगीता कॉलनी (१), एन वन सिडको (३), एन सहा, सिंहगड कॉलनी (२), कांचनवाडी (१), एन सात सिडको (१), कैलास नगर (१), एन तीन सिडको (१), एन चार सिडको (२), भगवती कॉलनी (१), एमजीएम परिसर (१), बीड बायपास (१), एन नऊ, हडको पवन नगर (१), भावसिंगपुरा (२), मिश्रा कॉलनी (१), स्टेपिंग स्टोन शाळा परिसर (१),सूतगिरणी चौक (१), दिल्ली गेट (३), तोरण गड नगर (१), बन्सीलाल नगर (१), ग्लोरिया सिटी पडेगाव (१), जीडीसी हॉस्टेल परिसर (१), आकाशवाणी परिसर (१), शेंद्रा, एमआयडीसी (१), नक्षत्रवाडी (१), अन्य (१६)
ग्रामीण भागातील बाधित : बायपास रोड, सिल्लोड (१), वाळूज महानगर (१), वरूड बु. (१), अन्य (८)
पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटी रुग्णालयात रेणुका माता मंदिर परिसर, बीड बायपास येथील ८८ वर्षीय पुरूष, टीव्ही सेंटर रोड, गणेश कॉलनीतील ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात विमानतळ परिसरातील ६६ वर्षीय पुरूष, दर्गा रोड परिसरातील ८१ वर्षीय पुरूष व रेल्वे स्थानक परिसरातील जहागीरदार कॉलनीतील ७१ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोरोना मीटर
-------
बरे झालेले रुग्ण ः ४३९४३
उपचार घेणारे रुग्ण ः ४५६
एकूण मृत्यू ः १२०५
-------
आतापर्यंतचे बाधित ः ४५६०४
-------
Edited - Ganesh Pitekar