Corona Update : औरंगाबादेत ७० जण कोरोनाबाधित, ७०९ रुग्णांवर उपचार

मनोज साखरे
Friday, 11 December 2020

औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी (ता.११)  ७० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी (ता.११)  ७० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार २५० झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १६७ जणांचा मृत्यू झाला. सध्या ७०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज १०४ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४२ हजार ३७४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : एन-२ सिडको (१), हरिप्रसाद नगर (१), होनाजी नगर (१), न्यू उस्मानपुरा (१), एन-३ सिडको (४), समर्थ नगर (३), खडकेश्वर (१), सहकार नगर (२), बीड बायपास (१), छावणी परिसर (१), जयभवानी नगर (१), खिंवसरा पार्क (१), रेल्वे स्टेशन परिसर (२), एमजीएम परिसर (१), इटखेडा (१), हर्सुल टी पॉइंट (३), राजेश नगर, बीड बायपास (१), सुराणा नगर (१), गारखेडा परिसर (१), बनेवाडी (२), साई मेडिसिटी हॉस्पीटल परिसर (१), अन्य (१६)

ग्रामीण भागातील बाधित : शहापूर, घोडेगाव (१), ए.एस. क्लब जवळ, तिसगाव (१), अनय्‍ (२१)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
शहरातील एका खासगी रुग्णालयात म्हाडा कॉलनी, देवानगरी येथील ७२ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोरोना मीटर
------------
बरे झालेले रुग्ण ः ४२३७४
उपचार घेणारे रुग्ण ः ७०९
एकूण मृत्यू ः ११६७
------------

आतापर्यंतचे बाधित ः ४४२५०
------------

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 70 Cases Recorded In Aurangabad News