
औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी (ता.१६) दिवसभरात ५४ जणांना सुटी मिळाली तर चोवीस तासांत ८७ कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.१६) दिवसभरात ५४ जणांना सुटी मिळाली तर चोवीस तासांत ८७ कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे.आजपर्यंत ४२ हजार ९०६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४४ हजार ६०९ वर पोचली आहे. आतापर्यंत १ हजार १७८ जणांचा मृत्यू झाला असून ५२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहेत.
शहर हद्दीत कोरोनाबाधित परिसर (कंसात रुग्णसंख्या) : सिडको एन तीन (१), सूतगिरणी चौक परिसर (१), सिडको एन सात (४), बालाजीनगर (१), औरंगपुरा (१), वेदांतनगर (१), ठाकरे नगर (१), उल्कानगरी (१), पेठेनगर (१), सारा सिटी (१), दर्गा रोड (३), नक्षत्रवाडी (१), पवन नगर (२), नंदनवन कॉलनी (१), समर्थनगर (१), आकाशवाणी परिसर (१), अलका नगर (१), एन दोन (१), मुकुंदवाडी (१), एन पाच सिडको (१), अमृतसाई सिटी (१), बंजारा कॉलनी (१), न्यू उस्मानपुरा (१), सिल्क मिल कॉलनी (१), पटेलनगर, बीड बायपास (१), अन्य (३९) असे एकुण ७० रुग्ण वाढले आहेत.
ग्रामीण भाग : नाथ गल्ली, पैठण (१), सोलेगाव, गंगापूर (१), जय भवानी नगर, वडगाव (१), नागनाथ नगर, वैजापूर (१), अन्य (१३) असे एकुण १७ रुग्ण वाढले आहेत.
एका कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत होनाजी नगरातील ६० वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना मीटर
उपचार सुरु -------- ५२५
बरे झालेले----------४२,९०६
मृत्यू---------------१,१७८
एकुण रुग्ण ---------४४,६०९
संपादन - गणेश पिटेकर