esakal | शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची कोरोनावर मात; सर्वांचे मानले आभार
sakal

बोलून बातमी शोधा

44Chandrakant_khaire

माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी कोरोनावर मात केली आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची कोरोनावर मात; सर्वांचे मानले आभार

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद : माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी कोरोनावर मात केली आहे. आज बुधवारी (ता.१६) त्यांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. ता.९ डिसेंबर रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर खैरे यांना औरंगाबाद येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. माझ्या प्रकृतीची शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह लोकप्रतिनिधी - प्रशासकीय अधिकारी आदींनी आस्थेने विचारपूस केली.

आजारपणात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे धीर देणाऱ्या सर्वांचा मी आभारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खैरे यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, अ‍ॅड. आशुतोष डंख, युवासेना जिल्हा युवाधिकारी तथा नगरसेवक ऋषिकेश खैरे, नगरसेवक सचिन खैरे, कमलेश झवेरी, डॉ.उन्मेष टाकळकर, डॉ.ज्ञानेश्वर झडे, डॉ.रोठे आदींची उपस्थिती होती.


प्रकृतीत सुधारण्यासाठी महाआरती
चंद्रकांत खैरे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी मंगळवारी (ता.१५) सातारा येथील ग्रामदैवत श्री. खंडोबा मंदिरात संध्याकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवासेना उपशहर अधिकारी अजय चोपडे, शिवसेना उपशहर प्रमुख रमेश बाहुले, किशोर साबळे, विभागप्रमुख प्रदीप जाधव, रणजित ढेपे, उपविभागप्रमुख बाळू मिसाळ, संतोष जाटवे, मनोज सोनवणे, शाखाप्रमुख ईश्वर पारखे, विशाल धुमाळ, रामेश्वर चौधरी, आनंद सुरडकर, ज्ञानेश्वर निकम, हरेंद्र जाधव, स्वप्नील साबळे, किशोर गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांसह भाविक झाले सहभागी होते.

संपादन - गणेश पिटेकर