औरंगाबादेत आज ९९ कोरोनाबाधित, जिल्ह्यात ३५ हजार ६२८ कोरोनामुक्त

मनोज साखरे
Tuesday, 27 October 2020

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण ९९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ६६४ झाली.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण ९९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ६६४ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार ६३ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकुण ९७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टमध्ये शहरातील ४१ व ग्रामीण भागातील १२ रुग्ण आढळले. आज १५४ जणांना सुटी झाली. यात शहरातील ७६ व ग्रामीण भागातील ७८ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ३५ हजार ६२८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

दगाफटका झाला तर उत्तर देऊ, संभाजीराजे छत्रपतींचा मराठा आरक्षणावरुन सरकारला इशारा

शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या)

एन दोन सिडको (१), राम नगर (१), चिकलठाणा (१), सातारा परिसर (१), म्हसोबा नगर (१), गोलवाडी (१), जसवंतपुरा, सेंट्रल नाका रोड (१), सहकार नगर (१), आदित्य हॉस्पीटल पसिसर (१), विश्वनगरी, सातारा परिसर (१), सातारा पोलिस स्टेशन परिसर (१), टाऊन सेंटर, एन वन (१), उस्मानपुरा (१), एन अकरा, गजानन नगर (१), नक्षत्रवाडी (१), गारखेडा परिसर (१), अरिहंत नगर (१), एन तीन सिडको (१), बंजारा कॉलनी (२), बालाजी नगर (१), शिवाजी नगर (१), जय भवानी नगर (१), निराला बाजार (२), पीर बाजार (१), न्यू हनुमान नगर (१), एन नऊ हडको (१), बीड बायपास (१), अन्य (२)

ग्रामीण भागातील बाधित

गंगापूर (१), कन्नड (४), खुलताबाद (१), सिल्लोड (३), वैजापूर (३), वाळूज (१), पंढरपूर (३), पवन नगर, रांजणगाव (१), एमआयडीसी पोलिस स्टेशन परिसर, बजाज नगर (१), अंतापूर (२), लासूर स्टेशन (१), लाखणी, मनूर, वैजापूर (४), महालगाव, गंगापूर (१), पैठण (१),

कोरोना मीटर
------------
बरे झालेले रुग्ण : ३५६२८
उपचार घेणारे रुग्ण : ९७३
एकुण मृत्यू : १०६३
---------
आतापर्यंतचे बाधित : ३७६६४
-----------

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 99 Cases Reported In Aurangabad