Corona Update: औरंगाबादेत कोरोनाने घेतला बाराशे जणांचा बळी, जिल्ह्यात ४६९ रुग्णांवर उपचार

प्रकाश बनकर
Thursday, 31 December 2020

औरंगाबाद  जिल्ह्यात सरत्या वर्षात कोरोनाने चांगलाच थैमान घातला होतो. याच कोरोनामुळे जिल्ह्यात ५ एप्रिलला पहिला मृत्यु झाला होता.

औरंगाबाद : जिल्ह्यात सरत्या वर्षात कोरोनाने चांगलाच थैमान घातला होतो. याच कोरोनामुळे जिल्ह्यात ५ एप्रिलला पहिला मृत्यु झाला होता. कोरोनाची ही मृत्युची मालिका अशीच कायम सुरु असून आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार २०० जणांचा बळी गेला आहे. बुधवारी (ता.३०) दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ६८ रूग्णांची नव्याने भर पडली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्‍ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला. यात मध्यल्या काळात मृत्युदरही राज्यात सर्वाधिक झाला होता.

 

 

यानंतर तो आटोक्यात आणण्यात आला. शहारात गेल्या दोन महिन्यापासून दोन ते चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहेत. जिल्ह्यात एकुण कोरोना बाधितांची संख्या ही ४५ हजार ५४४ वर गेली आहे. त्यापैकी ४३ हजार८७५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या ४९६ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. बुधवारी दिवसभरात महापालिका हद्दीतून ३७, तर ग्रामीण भागातून ११ असे ४८ जणांना सुटी देण्यात आली. कोरोनामुळे बाराशे जणांचा बळी गेले आहेत. बळी गेलेल्याचा हा आकडा कोरोना असतानाही काळजी न घेणाऱ्या औरंगाबादकरांसाठी धोक्‍याची घंटाच आहे.

 

 

 

महापालिका हद्दीत (कंसात कोरोना संख्या) : भगवती कॉलनी (६), श्रेयनगर (१), एन-३ सिडको (१), एन-५ सिडको (१), चिकलठाणा (१),कटकट गेट (१),पुंडलिक नगर (१), एन-३ सिडको (१),भावसिंग पुरा (१), टी.व्ही. सेंटर (२), मिल्ट्री हॉस्पिटल परिसर (१), देवळाई रोड सातारा परिसर (१), क्रांती चौक (१), सिव्हील हॉस्पिटल (१), नागेश्वरवाडी (२), कांचनवाडी (१), चेलीपुरा (१), पडेगाव (१), गारखेडा (३), प्रतापगड नगर, सिडको (१), भानुदास नगर (१), मंजित प्राईड (१), उस्मानपुरा (१), बीड बायपास (१), अन्य (२७) असे एकुण ६० वाढले आहेत.

ग्रामीण भागात : पाचोड (२), रांजणगाव (१), अन्य (५) असे एकुण- ८ जणांची वाढ आहे.

दोघांचा  मृत्यू
खासगी रुग्णालयात ऊर्जा नगर, सातारा परिसरातील ६० वर्षीय पुरुष, राजा बाजार येथील ७४ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

कोरोना मीटर
बरे झालेले------४३८७५
मृत्यु--------१२००
उपचार घेणारे-------४६९
एकुण कोरोना------ ४५५४४

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Fatality Number Crossed One Thousand And Two Hundred Aurangabad