esakal | Corona Update : औरंगाबादेत दिवसभरात वाढले ११९ कोरोना रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

3korona_60

औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी (ता.२८) दिवसभरात ११९ कोरोना रुग्णांची भर पडली, तर २६५ जणांना सुटी देण्यात आली.

Corona Update : औरंगाबादेत दिवसभरात वाढले ११९ कोरोना रुग्ण

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.२८) दिवसभरात ११९ कोरोना रुग्णांची भर पडली, तर २६५ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ३५ हजार ८९३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण बाधितांची रुग्णांची संख्या ३७ हजार ७८३ झाली आहे. आतापर्यंत एकूण १ हजार ६६ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ८२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब संकलन पथकास ३८ आणि ग्रामीण भागात १६ रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

माणुसकीला काळिमा फासणारी घटना, औरंगाबादजवळ जादूटोण्याच्या संशयावरून अपंग व्यक्तीस दगडाने ठेचून मारले

महापालिका हद्दीत श्रीराम नगर (१), हर्सूल (१), रेवा रेसिडेन्सी, उस्मानपुरा (१), नंदनवन कॉलनी, (१), पन्नालाल नगर (१), अन्य (२), एन ५ सिडको (१), होनाजी नगर (१), टि व्हि सेंटर (१), विष्णूनगर (१), म्हाडा कॉलनी, एन- २ सिडको (१), जहागीर कॉलनी (६), नक्षत्रवाडी (२), अक्षय पार्क सिडको १ (१), अक्षय पार्क एन ९ सिडको (१), सौभाग्य चौक, एन अकरा (१), गव्हमेंट कार्टर, स्नेहनगर (१), वर्धमान बँक परिसर (१), उत्तरा नगरी (१), व्यंकटेश नगर, पिसादेवी (१), दत्त विहार , पिसादेवी रोड परिसर (१), मयूर पार्क (१), सदाशिव नगर (१), लेबर कॉलनी कलेक्टर ऑफिस परिसर (१) असे ४२ जण आढळले आहेत.

ग्रामीणमध्ये पैठण (१), तांलपिंप्री, गंगापूर (१), हांडेगाव, गंगापूर (१), खुलताबाद (१), सिडको महानगर तिसगाव (३), सावरकर चौक , बजाजनगर (१), टोकी गंगापूर (१), भांजी मंडी, पंढरपूर (२), पोलिस स्टेशन परिसर (५), बालाजी नगर ,कमलापूर (२), जैतापूर कन्नड (१), लक्ष्मीनारायण नगर, वैजापूर (१),भेंडाळा, गंगापूर (१), औरंगाबाद (१), फुलंब्री (४), गंगापूर (३), खुलताबाद (५), वायाळवस्ती, सिरसगाव (१), जोगेश्वरी (१) असे ३९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

पेट्रोल, डिझलची चोरी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड; सहा जण अटकेत

कोरोना मीटर
उपचार सुरु : ८२४
बरे झालेले : ३५८९३
मृत्यू  : १०६६
एकूण रुग्ण : ३७७८३

संपादन - गणेश पिटेकर