CoronaUpdate : औरंगाबादेत ६५ कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रूग्णसंख्या गेली ४१ हजारांच्या पुढे

ई सकाळ टीम
Tuesday, 17 November 2020

औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता.१६) ८२ जणांना (यात महानगरपालिका ६३, ग्रामीण १९) रूग्णालयातून सुटी  देण्यात आली. आजपर्यंत ३९ हजार ९८७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

औरंगाबाद  :  औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता.१६) ८२ जणांना (यात महानगरपालिका ६३, ग्रामीण १९) रूग्णालयातून सुटी  देण्यात आली. आजपर्यंत ३९ हजार ९८७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सोमवारी एकूण ६५ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यात शहरात ४५, तर ग्रामीण भागात २० असे रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४१ हजार ६६२ झाली आहे. आतापर्यंत एकूण एक हजार ११९ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ५५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे. 

वीजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू, पैठणमधील एकतूनी तांडा येथील घटना

शहर (कंसात रुग्ण संख्या)  : सिद्धार्थ गार्डन क्वार्टर परिसर (३), बन्सीलाल नगर (१), सातारा परिसर (३),मुकुंदवाडी (१), खोकडपुरा (१), एल ऍ़न्ड  टी कंपनी परिसर (२), शंभू नगर (१), मिटमिटा (१), गादिया विहार (१), कामगार चौक (१), जय भवानी नगर (१), गुलमंडी (१), न्यू हनुमान नगर (१), कल्पतरू सो. (१), श्रेय नगर (३), एन सात (१), मयूर नगर (१),  दिशा कृष्णा अपार्टमेंट (१), पद्मपुरा (१), देवानगरी (१), अन्य (१८)

ग्रामीण : कुंभेफळ (३), सिल्लोड (१),  करंजखेड, कन्नड (१), भोकरगाव, मनूर (३), वाहेगाव, गंगापूर (१), अन्य (११)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू 
शहरातील खासगी रूग्णालयात वैजापूर तालुक्यातील नाडी येथील ६८ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid New 65 Cases Reported In Aurangabad