वीजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू, पैठणमधील एकतूनी तांडा येथील घटना

शेख मुनाफ
Monday, 16 November 2020

गव्हाला पाणी भरण्यासाठी विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या एका शेतकरयाचा मृत्यू झाल्याची घटना एकतुनी तांडा नंबर दोन (ता. पैठण) येथे सोमवारी (ता. १६) रोजी घडली. मोतीलाल काळु पवार (वय५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आडूळ प्राथमिक उपचार केंद्रात नेले असता तिन्ही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने मृतदेह दोन तास होता पडून. 

आडूळ (औरंगाबाद) : गव्हाला पाणी भरण्यासाठी विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या एका शेतकरयाचा मृत्यू झाल्याची घटना एकतुनी तांडा नंबर दोन (ता. पैठण) येथे सोमवारी (ता. १६) रोजी घडली. यानंतर सदरील शेतकऱ्याला नातेवाईक व ग्रामस्थांनी उपचारासाठी आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता येथेकार्यरत असलेले एक ही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने तब्बल दोन तास रुग्ण रुग्णालयाबाहेर गाडीतच पडून होता. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर असलम सय्यद यांनी रुग्णाला तपासले. मात्र, तो पर्यंत शेतकरयाचा मृत्यू झालेला होता. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

एकतुनी तांडा नंबर दोन (ता.पैठण) येथील शेतकरी मोतीलाल काळु पवार (वय५०) हे सोमवारी दुपारी बारा वाजता गव्हाला पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोटारीचा विद्युत पुरवठा चालू करण्यासाठी स्टार्टर चालू करीत असतांना त्यांना विजेचा शॉक लागला. त्यामुळे ते बेशुद्ध झाल्याने त्यांना उपचारासाठी आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मात्र यावेळी येथे कार्यरत तिन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एक ही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यानंतर येथील १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर असलम सय्यद यांनी या रुग्णाला तपासले. मात्र तो पर्यंत उशीरा झालेला होता. या घटनेची माहिती आडुळ बिट जमादार यांना देण्यात आली. यानंतर शवविच्छेदनासाठी येथील दोन वैद्यकीय अधिकारी यांचे भ्रमणध्वनी बंद होते. तर एका वैद्यकीय अधिकारयाने पाचोड ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा अजब सल्ला दिला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी शवविच्छेदन न करताच मृतदेह ताब्यात घेवून गावाकडे निघून गेले.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer dies of electric shock incident at Ektuni Tanda Paithan