CoronaUpdate : औरंगाबादेत १४२ कोरोनाबाधित, दोन हजार ३५३ रुग्णांवर उपचार सुरू

प्रकाश बनकर
Thursday, 15 October 2020

औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी (ता.१४) कोरोना मुक्त झालेल्या ३०९ जणांना सुटी देण्यात आली.

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.१४) कोरोना मुक्त झालेल्या ३०९ जणांना सुटी देण्यात आली. दिवसभरात नव्याने १४२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यत ३२ हजार ४१५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात एकुण कोरोनाबाधिताची संख्या ३५ हजार ७७६ झाली आहे, तर आतापर्यंत १ हजार ८ जणांचा मृत्यू झाला आहेत. सध्या दोन हजार ३५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब संकलन पथकास ५५ आणि ग्रामीण भागात २५ रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

चोवीस तासात मराठवाड्याच्या चाळीस मंडळांमध्ये अतिवृष्टी

शहरी भागात कंसात रुग्णसंख्या : गुरू रामदेव नगर (१), एन अकरा हडको (१), उल्कानगरी (१), वेदांत नगर (१), सातारा परिसर (१), बीड बायपास परिसर (१), एन अकरा सिडको (२), एन अकरा सुदर्शन नगर (२), जाधववाडी, मयूर पार्क (१), एन दोन विठ्ठल नगर (१), एन आठ सिडको (३), अन्य (१), शिवेश्वर कॉलनी (२), मुकुंदवाडी (२), एन दोन संघर्ष नगर (१), हुसेन कॉलनी (१) उस्मानपुरा (१) यांचा समावेश आहे.

ग्रामीण : पाटोदा (१), मांडकी (१), पिशोर, कन्नड (१), हिवरखेडा, कन्नड (३), अंबेलोहोळ, गंगापूर (१), भेंडाळा, गंगापूर (७), बजाज नगर (३), दत्त कॉलनी, वाळूज (१), शिवकृपा नगर, कचनेर (१), वाकळा, वैजापूर (२), नांदरा,पैठण (३), गारज, वैजापूर (१), बाभूळगाव, वैजापूर (१), वरचा पाडा शिऊर वैजापूर (१), पिंपळवाडी, पैठण (१), तांदुळवाडी, गंगापूर (१), शिऊर, गंगापूर (१), गणपती बोरगाव, फुलंब्री (१), चित्तेगाव (१), चंद्रलोक नगरी, कन्नड (५), आदर्श कॉलनी, कन्नड (१), फुलंब्री (१), गंगापूर (१), कन्नड (९), सिल्लोड (९), वैजापूर (१), पैठण (४), सोयगाव (१) यांचा समावेश आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Positive 142 Cases Reported In Aurangabad