esakal | Corona Update : औरंगाबादेत १६४ कोरोना रुग्णांची भर, आतापर्यंत ९६९ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

3korona_60

औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता. ५) नव्याने १६४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले.

Corona Update : औरंगाबादेत १६४ कोरोना रुग्णांची भर, आतापर्यंत ९६९ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी (ता. ५) नव्याने १६४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ८९, ग्रामीण भागात २६ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या ३४ हजार ५५० वर पोचली आहे. उपचारानंतर बरे झालेल्या आणखी २४५ जणांना आज सुटी देण्यात आली. यात शहरातील २१३, ग्रामीण भागातील ३२ जणांचा समावेश आहे. सध्या ४ हजार २५४ रुग्णांवर उपचार सुरू असून २९ हजार ३२७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ९६९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

चव्हाण यांना बिहारला पाठवून जिल्हा वाऱ्यावर सोडू नका, औरंगाबादच्या...

शहरातील बाधित : गुलमोहर कॉलनी (१), म्हाडा कॉलनी (१), सुदर्शन नगर (१), बालाजी नगर (१), जयभवानी नगर (१), सिंधी कॉलनी (१), जालान नगर (१), समर्थ नगर (१), पडेगाव (२), वेदांत नगर (१), एन-२ (१), मगर वस्ती (२), सिडको महानगर (१), वानखेडे नगर (१), टाऊन सेंटर एन-१ (१), शिवाजी नगर गारखेडा (१), रेणूका नगर (१), एन-१ सिडको (१), हर्सूल सावंगी (१), ठाकरे नगर एन-२ (१), घाटी रुग्णालय परिसर (२) भावसिंगपूरा (२), विशाल नगर (१), गारखेडा (१), विश्वभारती कॉलनी (१).

ग्रामीण भागातील बाधित : फुलंब्री (१), तिसगाव (१), साई मंदिर बजाज नगर (१), माळी गल्ली रांजणगाव (१), लासूर (५), पैठण (४), लक्ष्मी नगर वैजापूर (२), पिंपरखेडा कन्नड (२), दहेगाव (१), धनगरवाडी आवाळा कन्नड (१), पिंपळवाडी पैठण (१).

‘हॉटेल सुरु झाली, आता पर्यटनस्थळे खुली करा’

चौघांचा मृत्यू
बिडकीन (पैठण) येथील ५७ वर्षीय पुरुष, सिडको एन-४ औरंगाबाद येथील ८५ वर्षीय पुरुष, येथील शिवाजीनगरातील ६८ वर्षीय पुरुष, क्रांती चौक भागातील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
 

Edited - Ganesh Pitekar