हिंगणघाट, सिल्लोडनंतर आता ठेचावीच लागेल... 

मनोज साखरे
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

एखादी आवडती व्यक्ती आपलीच असावी, आपल्याला ती हवीच. तिला हवे तसे वापरावे, ही मानसिकता आता वाढीस लागलेली आहे. बालपणापासून मुलांच्या इच्छा, हट्ट पुरवले जातात. त्यांच्या छोट्या चुकाही पदरात घेतल्या जातात. त्यांच्या चुकांना आळा घातला जात नाही. परिणामी ती हट्टी व हव्यासी बनतात. त्यामुळे नंतर ती नकार पचवू शकत नाहीत. पुढे याचे अनिष्ट परिणाम घडतात.

औरंगाबाद - एकीकडे महिलांच्या मनोधैर्यासाठी विविध योजना राबविल्या जातानाच महिला, मुलींवरच ऍसिड ऍटॅक, पेट्रोल ओतून पेटविल्याच्या आणि अत्याचाराच्या घटनांनी समाजमनाला पाठोपाठ हादरे बसत आहेत.

हिंगणघाट येथील निष्पाप प्राध्यापिकेला अमानुषपणे पेटविल्याच्या प्रकरणानंतर हा प्रश्‍न अधिकच गंभीर बनला आहे. आपण निर्भया गमावली. दिशावर विकृतीची नजर पडली ती गेली.

हेही वाचा अन्‌ आमदार प्रशांत बंब म्हणाले, कोण चिखलीकर....   

हिंगणघाटच्या प्राध्यापिकेला प्रेमाच्या बुरख्याखाली जाळले अन्‌ तीही गेली. अंधारीतील (ता. सिल्लोड) महिलेला पेटवून मारले. पुन्हा कुणी जाण्याअगोदर अशी विकृत मानसिकता ठेचण्याची गरज आता निर्माण झाली आहे. 

एखादी आवडती व्यक्ती आपलीच असावी, आपल्याला ती हवीच. तिला हवे तसे वापरावे, ही मानसिकता आता वाढीस लागलेली आहे. बालपणापासून मुलांच्या इच्छा, हट्ट पुरवले जातात. त्यांच्या छोट्या चुकाही पदरात घेतल्या जातात. त्यांच्या चुकांना आळा घातला जात नाही.

परिणामी ती हट्टी व हव्यासी बनतात. त्यामुळे नंतर ती नकार पचवू शकत नाहीत. पुढे याचे अनिष्ट परिणाम घडतात. निर्भया, दिशा अन्‌ हिंगणघाटच्या प्राध्यापिकेच्या मारेकऱ्यांसारखीच विकृती समाजात वारंवार डोके वर काढीत आहे.

हेही वाचा त्या आमदारांना बांगड्या पोस्टाने पाठवणार, विद्यार्थी संघटनांचा आक्रोश 

औरंगाबादेत स्कूलबसमध्ये एका गतिमंद मुलीसोबत गैरप्रकार झाला. चालकाकडून झालेला हा प्रकार म्हणजे भयानक मानसिकता होती. मुली, महिलांविषयी निर्माण झालेल्या विकृत मानसिकतेला सहज घेतल्यामुळे अशा प्रवृत्तींत वाढ होत आहे. छेडछाड मुळात गंभीर प्रकार; पण तो दररोजचाच असा समज समाजात वाढत आहे. त्यातून अनेक प्रश्‍नही निर्माण होत असून ते नंतर अधिकच सतावत आहेत. 

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोनाली देशपांडे सांगतात... 
 

  • सोशल मीडियाचा अतिवापर, आभासी जगात रममाण होण्याची वृत्ती चुकीची. 
  • पर्सनल लाइफ सोशल मीडियावर जाहीर करण्याचा हव्यास नकोच. 
  • सोशल मीडियावर काय टाकायचे, काय नको याची खबरदारी घ्यायलाच हवी. 
  • स्वत:ला एक्‍स्पोज करताना आपल्यात इंटरेस्टेड व्यक्तीला आपणच माहिती पुरवीत असतो. 
  • सोशल मीडियावर एक्‍स्पोज करताना तुम्हाला गुन्हेगारी प्रवृत्तीचे अनेकजण फॉलो करीत असतात. 

...म्हणून वाढते संकट

लोकांचा फोकस क्षणिक गोष्टींकडे अधिक आहे. स्वत:सोबत घडणाऱ्या छोट्या घटनांकडे काणाडोळा, दुर्लक्ष होते. त्यानंतर धोक्‍याचा अंदाज येत नाही किंवा घेतला जात नाही. पुढे योग्यवेळी मदत घेतली जात नाही. नाइलाजाने छेडछाड सहन करण्याची मानसिकता केली जाते. परिणामी समोरच्यांची हिंमत वाढते. मग ती प्रवृत्ती वरचढ ठरते. त्यातून मोठी समस्या उद्‌भवते. छेडछाड, अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी मुलींना विश्‍वास देण्याची, सक्षम बनविण्याची पालकांची जबाबदारी आहे. 

महिला सुरक्षित नाहीतच 

मुली, महिला सुरक्षित नाहीतच. एखादी घटना घडली की, तेवढ्यापुरते बोलले जाते. पण यापुढे जाऊन चळवळीच्या दृष्टीने कार्य करण्याची गरज आहे. कुटुंबातील महिलांचे संरक्षण घरातील पुरुष करतात; परंतु स्त्री बाहेर पडली की, तिच्यावर अत्याचारही पुरुषांकडूनच होतात. स्त्रीला व्यक्ती म्हणून वागणूक देण्याचे संस्कार बालवयापासून व्हायला हवेत. सुनीता तगारे (सामाजिक कार्यकर्त्या)शहरात 2019

 

या वर्षातील 
महिलाविषयक गुन्हे 

साधारणत: महिन्यात 39 गुन्हे होतात दाखल. 
पळवून नेणे, अपहरण : 126 गुन्हे 
विनयभंग, छेडछाड : 272 
बलात्कार : 78 
अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा : 2 

हेही वाचा :

53 आमदार,खासदारांना पाणी प्रश्‍नावरील बैठकीचे वावडे (वाचा कोण आहेत ते)...  

पंकजा मुंडेच्या आंदोलनावर टिकेची झोड, तरीही प्रशांत बंब बोलवणार लोकप्रतिनिधीची बैठक  

सत्तेतल्या नेत्यांनो, वायफळ बडबड करू नका  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime Against Women Aurangabad News