
प्रत्येक गावात कायमस्वरुपी पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांसाठी सिंचनाचे पाणी मिळण्याच्या दृष्टीने सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन मांडणी करण्यासाठी औरंगाबादेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
औरंगाबाद: मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी रविवारी (ता.दोन) मराठवाड्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी सर्वांना निमंत्रण पाठविण्यात असल्याचे आयोजक आमदार प्रशांत बंब यांनी शुक्रवारी (ता.31)पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या सोमवारी (ता.27) भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत उपोषण करीत मराठवाडयाच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यानंतर आता प्रशांत बंब देखील सरसावले आहेत. प्रत्येक गावात कायमस्वरुपी पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांसाठी सिंचनाचे पाणी मिळण्याच्या दृष्टीने सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन मांडणी करण्यासाठी औरंगाबादेत 2 फेब्रुवारी रोजी हॉटेल अँबेसेडर येथे दुपारी बारा वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत दहा ते अकरा लोकप्रतिनिधी सोडता इतरांनी पाठ फिरवली,यामूळे रविवारी होणाऱ्या या बैठकीत किती लोकप्रतिनिधी येणार हे औसुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा :सत्तेतल्या नेत्यांनो, वायफळ बडबड करू नका
पंकजा मुंडे यांचे उपोषणाचा एक इव्हेंट झाला
सत्तेतून पायउतार झाल्यानंतर मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरू लागले आहेत. सोमवारी पंकजा मुंडे यांचे उपोषण झाले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणतर्फे हे उपोषण करण्यात येणार होत. मात्र भाजपने हे उपोषण हायजॅक करीत भाजपने उपोषण केले.त्यास विधानसभा व विधानपरिषदेच्या दोन्ही सभागृहाचे विरोधीपक्ष नेते, भाजपचे प्रदेशाध्यक्षापासून ते केंद्रीय राज्यमंत्री उपोषणात सहभाग घेतला होता. यामूळे या उपोषणाचा एक इव्हेंट झाला असल्याची टीका सत्ताऱ्यांनी केली होती. यानंतर आता पुन्हा आमदार बंब यांच्यातर्फे पाणी प्रश्नावर सर्व पक्षीय बैठक घेण्यात येत आहे.
हेही वाचा : चुटकीसरसी लावा आता सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे संवेदनशील
आमदार बंब म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे संवेदनशील आहेत. 9 जानेवारी रोजी आरैंगबादेत झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी अत्यंत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मराठवाड्यातील पाणी, सिंचन, शेती, रोजगार यासह सर्वच प्रश्नावर चर्चा केली होती. त्यामुळे शंभर टक्के सिंचन आणि पाण्याची मागणी करण्यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर व निवडक तज्ञांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. या विचारमंथनातून शाश्वत पाण्यासाठी आवश्यक उपाय योजनांवर लक्ष केंद्रीत करून एक अभ्यासपुर्ण प्रस्ताव आपल्याला शासनाकडे पाठवता येईल. पुढील पाच वर्षाचा आराखडा तयार करून त्यांची अंमलबजावणी करणे कसे आवश्यक आहे हे आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊ यासाठी ही बैठक असणार असल्याचेही श्री.बंब यांनी सांगितले.मराठवाड्याचे मागसलेपण दूर करणे महत्वाचे असल्यामुळे सगळ्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून या बैठकीला आर्वजून उपस्थित राहावे असे आवाहन देखील आमदार बंब यांनी केले आहे.
हेही वाचा : प्रवेश, नोकऱ्या कमी असलेले आयटीआय कोर्सेस बंद होणार - मलिक