
चांगले आरोग्य राहते, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येकाने सायकलचा वापर करावा, याच संकल्पनेतून महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय सोमवारी (ता.दोन) सायकल चालवत महापालिकेत येणार आहेत.
औरंगाबाद : चांगले आरोग्य राहते, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येकाने सायकलचा वापर करावा, याच संकल्पनेतून महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय सोमवारी (ता.दोन) सायकल चालवत महापालिकेत येणार आहेत."सायकल टू वर्क डे" या संकल्पनेनुसार हा उपक्रम साजरा होणार आहे. यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला कार्यालयात यावेत अशा सूचना प्रशासक पांडेय यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवारांच्या घरावर मोर्चा काढत विचारणार जाब, मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक
सायकल्स फॉर चेंज या मोहिमेअंतर्गत प्रशासकांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सायकलवर कार्यालयात येण्याची सूचना केली होती. प्रशासक यांच्या सोबतच इतर अधिकारी देखील सायकलवर कार्यालयात येणार आहे. श्री पांडेय यांनी अकोला जिल्हाधिकारी असताना देखील हा प्रयोग यशस्वीरित्या अंमलात आणला होता. सायकल चालविणे फक्त क्रीडाचा एक भाग म्हणून नाही तर दैनंदिन जीवनात सायकलीचा वापर वाहन म्हणून करण्याची मानसिकता सर्वसामान्यांमध्ये विकसित होणे गरजेचे आहे. आरोग्य बरोबर प्रदूषण कमी करण्यास या सवयीमुळे फायदा होईल. नागरिकांनी देखील या उपक्रमास हातभार लावून दैनंदिन जीवनात सायकलीचा वापर करावा असे आवाहन प्रशासक अस्तिककुमार पांड्ये यांनी केले आहे.
संपादन - गणेश पिटेकर