स्वयंपाक सुरु करताच सिलींडरचा स्फोट, उपनिरीक्षकांच्या पतीने दाखविले धाडस 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

औरंगाबादेतील सुतगिरणी चौक परिसरातील लक्ष्मीनगरात शनिवारी (ता. १) सकाळी साडेअकराच्या सुमारास गॅस सिलेंडरच्या नळीने अचानक पेट घेतल्याने घरगुती साहित्याचे अंदाजे पन्नास हजारांचे नुकसान झाले. महिला उपनिरीक्षकाच्या पतीने धाडस केल्यामुळे जिवीत व मोठी आर्थिक हानी टळली.

औरंगाबादः सुतगिरणी चौक परिसरातील लक्ष्मीनगरात शनिवारी (ता. १) सकाळी साडेअकराच्या सुमारास गॅस सिलेंडरच्या नळीने अचानक पेट घेतल्याने घरगुती साहित्याचे अंदाजे पन्नास हजारांचे नुकसान झाले. महिला उपनिरीक्षकाच्या पतीने धाडस केल्यामुळे जिवीत व मोठी आर्थिक हानी टळली.

हेही वाचाः शेतकरी संतापले, नुकसानभरपाई मिळेलही; पण ते होऊ नये याची हमी कोण घेणार?

लक्ष्मीनगरातील संजय आधाने प्लॉट क्र. ९९ येथे घरमालक वासुदेव भाऊलाल महाजन व अन्य चार भाडेकरु राहतात. आधाने हे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला असून, त्यांच्या पत्नीदेखील एका ठिकाणी नोकरी करतात. बकरी ईदची सुटी असल्याने दाम्पत्य घरीच होते.

सकाळी स्वयंपाकाची तयारी सुरू असल्याने आधाने यांच्या पत्नीने गॅस पेटवला. त्यावेळी अचानक सिलेंडरच्या नळीने पेट घेतला. त्यामुळे घाबरुन गेलेल्या आधाने यांच्या पत्नीने स्वयंपाक खोलीतून बाहेर धाव घेतली. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे परिसरातील उपनिरीक्षक मीरा लाड यांचे पती धनराज घुगे यांनी धाव घेतली.

हेही वाचा- जेव्हा वकीलच होतो आरोपी....अन् न्यायाधीशांसमोर...  

त्यांनी आधाने यांचे तीन व आठ वर्षाची दोन्ही मुले घराबाहेर काढली. त्यानंतर ओल्या टॉवेलने गरम झालेले गॅस सिलेंडर घरासमोरील मैदानात आणून फेकले. तोपर्यंत अग्निशमन दल व जवाहरनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलातील प्रमुख एस. के. भगत, वैभव बाकडे, एस. पी. भोसले, अशोक वेलदोडे, बी. जी. भावले, दिनेश वेलदोडे, आदीनाथ बकले आणि बाबासाहेब तारे यांनी घरातील साहित्याची व गॅसची तपासणी केली. धनराज घुगे यांच्या धाडसामुळे आधाने कुटुंबियांचा जीव वाचला तसेच अनर्थ टळला.

हेही वाचा: व्याज कापल्याशिवाय बॅंका देईनात पीककर्ज, खरीपात कशी करु पेरणी म्हणत शेतकरी थेट खंडपीठात 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cylinder explodes Aurangabad News