esakal | आज उपोषण, उद्या रस्त्यावर उतरू : देवेंद्र फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

bjp Aurangabad

कृष्णा मराठवाडा योजनेला चार हजार कोटी आमच्या सरकारने दिले. काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, आम्हाला भीती आहे की काम बंद होईल यासाठी पंकजा मुंडे उपोषणाला बसल्यात, हक्कच पाणी वळवळ तर खबरदार, जनतेच्या मनातील जलयुक्त शिवार योजना आहे. तीचे नाव बदलायचे तर बदला मात्र योजना सुरू ठेवा असेही श्री. फडणवीस म्हणाले.

आज उपोषण, उद्या रस्त्यावर उतरू : देवेंद्र फडणवीस

sakal_logo
By
राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : पंकजा मुंडे यांचे अभिनंदन, आपण मराठवाडा दुष्काळ मुक्तीसाठी केलेले प्रयत्न पुढे गेले पाहिजे, मराठवाडा दुष्काळ मुक्त झाला पाहिजे यासाठी हे लाक्षणिक उपोषण आहे. भाजप सरकारच्या काळात आम्ही सुरू केलेल्या योजना आताच्या सरकारने पुढे नेल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करू,  आज उपोषण, उद्या रस्त्यावर उतरू असा इशारा  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.२७) सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयाजवळील दिल्ली गेट येथे भाजपचे धरणे आंदोलन सुरू झाले आहे. त्यावेळी ते बोलत होते. पाणी, सिंचन प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधन्यासाठी हे उपोषण आहे. या आंदोलनात रावसाहेब दानवे, खासदार प्रितम मुंडे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार नारायण कुचे, एकनाथ जाधव, तानाजीराव मुटकूळे, भाई भीमराव धोंडे, आमदार प्रशांत बंब, आमदार अभिमान्यु पवार, केशव आंधळे, शिरीष बोराळकर,  हरीभाऊ बागडे, संतोष दानवे, महादेव जानकर आदी सहभागी झाले आहेत.

हे वाचा : आम्ही केलेल्या कामाला वेग द्यावा, म्हणून उपोषण - पंकजा मुंडे

पुढे बोलतांना श्री. फडणवीस म्हणाले, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ सिंचन नसल्याने होत आहे. मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ आहे. आपल्या आधी 15 वर्ष आघाडी सरकार होत त्यावेळी मराठवाड्यावर अन्याय झाला. एक थेंबही हक्काचं पाणी दिल नाही. गोपीनाथ मुंडे उपोषणाला बसले होते. त्यावेळी आश्वासन दिले होते मात्र, सर्व पाणी पश्चिम महाराष्ट्रात वळवले. पाच वर्षात पाण्यासाठी कोर्टात खटला लढला. जलपरिषदच्या बैठक झाल्या नव्हत्या त्या आम्ही घेतल्या.

हेही वाचा : चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं

मराठवाड्याच वाहून जाणार पाणी मिळाले पाहिजे काम अंतिम टप्प्यात आहे. कोकणाच समुद्रात वाहून जाणार पाणी गोदावरीत आणायचे आणि मराठवाड्याचा दुष्काळ दूर करायचा विचार आमचा होता. वॉटर ग्रीड मुळे अनेक जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलं असत मात्र ते देखील स्थगित केले. टेंडर देण्यावरून वाद आहे टेंडर कोणालाही द्या मात्र काम सुरू करा.

हेही वाचा : याच्यावर आहे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे औरंगाबादेतून चोरले होते सत्तर तोळे सोने 

कृष्णा मराठवाडा योजनेला चार हजार कोटी आमच्या सरकारने दिले. काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, आम्हाला भीती आहे की काम बंद होईल यासाठी पंकजा मुंडे उपोषणाला बसल्यात, हक्कच पाणी वळवळ तर खबरदार, जनतेच्या मनातील जलयुक्त शिवार योजना आहे. तीचे नाव बदलायचे तर बदला मात्र योजना सुरू ठेवा असेही श्री. फडणवीस म्हणाले.